बहुचर्चित अरुण थूल मृत्यु प्रकरणी दोन डॉक्टरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
मृताचा मुलगा मोनाल थुल ने उपचारात निष्काळजीपणा, बनावट सह्या करून आयपीडी कागदपत्रे आणि बिले तयार केल्याचा व सिसिटीवी फुटेज मध्ये काट छाट केल्याचा केला होता आरोप
प्रकरणाचा तपास सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या बाहेर काढून अंबाझरी पोलिस ठाण्याकडे सोपविला
नागपूर. शहरातील प्रसिद्ध अरुण लक्ष्मण थूल मृत्यू प्रकरणाच्या तब्बल दोन वर्षांच्या तपासानंतर अखेर पंचशील चौक सीताबर्डी येथील गंगाकेअर हॉस्पिटलच्या दोन डॉक्टरांवर कलम ४६४,४६५,४७१,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडील अरुण थुल यांच्या उपचारात निष्काळजीपणा दाखवून, वडिलांच्या मृत्यूनंतर बनावट आयपीडी कागदपत्रे तयार करणे आणि उपचारादरम्यान वापरलेल्या औषधांची बिले तयार करणे, या कारणावरून मृत अरुण थूल यांचा मुलगा मोनाल थूल याने माहिती अधिकारात सीजीएचएस (केंद्रीय आरोग्य योजना सेवा) मागितलेल्या बिल मध्ये व पोलिसांच्या मार्फत मिळालेल्या बिल मध्ये तफावत. अरुण थुल यांच्या मृत्यूनंतर २९ ऑक्टोबर २०२० रोजी सीताबर्डी पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आणि शवविच्छेदन करण्यात आले. मोनालच्या मागणीवरून या प्रकरणाचा तपास सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या बाहेर काढून अंबाझरी पोलिस ठाण्यात देण्यात आला. त्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त डॉ.निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाझरी पोलिस ठाण्याचे एपीआय संतोष बोईने यांनी सुरू केला होता. अखेर 21 जून 2022 रोजी सीताबर्डी पोलिस ठाण्यातील गंगाकेअर हॉस्पिटलचे डॉ. अश्विनी कुमार खांडेकर आणि डॉ. वरुण भार्गववर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस आयुक्त अमितेशकुमार आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले, त्यामुळे दोन्ही डॉक्टरांवर गुन्हा दाखल होऊ शकला. निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी दोन डॉक्टरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल होण्याची ही राज्यातील बहुधा पहिलीच घटना आहे.
तरीही वैद्यकीय तपासणी समितीची चौकशी सुरू असून, त्यांचे उत्तर येणे बाकी आहे.
सविस्तर माहिती : आंबेडकर नगर धरमपेठ येथील रहिवासी असलेल्या मोनाल थुलचे वडील अरुण थुल यांना १७ ऑक्टोबर २०२० रोजी पंचशील चौक नागपुर येतील गंगा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अरुण थूल ह्यांना भूक लागत नव्हती आणि अशक्तपणा जाणवू लागला. ते एजी ऑफिसमध्ये वरिष्ठ लेखापाल होते. निवृत्त झाले होते. त्यामुळे त्यांना केंद्रीय आरोग्य योजना सेवेअंतर्गत गंगा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे रुग्णालय केंद्रीय आरोग्य योजना सेवेच्या पटलावर होते. मोनालच्या वडिलांनी दाखल केल्यानंतर प्राथमिक तपास डॉ.अश्विनीकुमार खांडेकर यांनी केला असून त्यांना १७ ऑक्टोबर २०२० रोजी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते . 21 ऑक्टोबर 2020 रोजी त्यांना प्रकृती बरी वाटत असल्या कारणाने आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले. 28 ऑक्टोबर 2020 रोजी मोनालने डॉ खांडेकर यांना सांगितले की आज वडील अरुण यांचे डायपर रक्ताने भरलेले आहे. त्याना घाईघाईने आयसीआयमध्ये दाखल करण्यात आले व यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर वैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी रुग्णालयाच्या डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप करत मोनालने सीताबर्डी पोलीस ठाण्यात ५ नोवेंबर २०२० रोजी तक्रार केली. पोलिसांनी २९ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री १ च्या सुमारास आकस्मिक मृत्यूची नोंद केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास अंबाझरी पोलिस ठाण्याकडे सोपवण्यात आला. तब्बल दोन वर्षांनंतर रुग्णालयातील दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणमध्ये, 28 ऑक्टोबर 2020 रोजी अरुण थूल ह्यांचा मृत्यू झाला, परंतु रुग्णालयाच्या नोंदीनुसार त्याना 29 ऑक्टोबर रोजी डिस्चार्ज दर्शविला गेला. एवढेच नाही तर औषधाची बिले आणि बेड नंबरही बदलण्यात आले व पोलिसांमार्फत मिळालेले बिल आणि सी जी एच एस मार्फत मिळालेले दोन्ही बिलांन मध्ये शुल्क देखी वेगळे वेगळे आहे. सत्य बाहेर यावे म्हणून मोनाल थूल ह्यांनी प्राथमिक तक्रारीत प्रमाणे पोलिसांनी त्यावेळी सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले नव्हते. वडिलांच्या मृत्यूनंतर मोनालने 5 नोव्हेंबर 2020 रोजी सीताबर्डी पोलिस ठाण्यात या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली आणि तपास सुरू झाला. या प्रकरणाचा तपास वैद्यकीय चौकशी समिती समोर चौकशी सुरू आहे. पोलिसांना समिती समोर अहवाल सादर करण्यासाठी 15 ते 20 दिवस लागले. दरम्यान, सीताबर्डी पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन घटनेच्या वेळी रुग्ण अरुण थूल कोणत्या अवस्थेत होता, याची सत्यता जाणून घेता आली असती. हा डॉक्टरांच्या निष्काळजीचा पुरावा बनू शकला असता, परंतु सीताबर्डी पोलिसांनी हॉस्पिटलला सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली असता त्यांनी मात्र १२ दिवसातील सीसीटीव्ही फुटेजची ही फक्त ३ GB ची दिली त्यात सोई नुसार काट छाट केल्याचे दिसून येते आहे.