सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संपत्तीत सात वर्षांत ३५७ टक्क्यांनी वाढ झाली आहे

नागपूर : भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संपत्तीत सात वर्षांत तब्बल ३५७ टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती पुढे येत आहे. एवढी मोहमाया बावनकुळे यांनी जमवलिच कशी, हा मात्र शोधाचा विषय आहे.

भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी विधान परिषदेसाठी अर्ज दाखल केला होता.  2014 मध्ये बावनकुळे यांनी कामठी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. 2014 ते 2021 या सात वर्षात बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबाच्या संपत्तीत 357 टक्के वाढ झाली आहे. 2014 मध्ये बावनकुळे यांच्या पत्नी, मुलगा आणि मुलगी यांच्याकडे 7 कोटी 49 लाख 93 हजार रुपयांची मालमत्ता होती. यामध्ये ६५ लाख ३५ हजार रुपयांच्या जंगम आणि ६ लाख ९४ लाख रुपयांच्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे.

2014 ते 2019 पर्यंत बावनकुळे हे राज्याचे ऊर्जा आणि उत्पादन शुल्क मंत्री होते. त्यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यात त्यांनी प्रतिज्ञापत्रात आपल्या मालमत्तेची सविस्तर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, बावनकुळे आणि त्यांच्या पत्नीकडे 90 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची स्थावर मालमत्ता आहे. 33 कोटी 84 लाख 73 हजारांची जंगम मालमत्ता आहे. त्यात जमीन, घर आणि व्यावसायिक मालमत्तांचाही समावेश आहे.

- Advertisment -