NMC च्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
नागपूर : शांतीनगर ईसासनी येथील समुदाय जीवन विकास केंद्र येथे दि. ७ जुलै रोजी नुकत्याच झालेल्या आयोजित कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये NMC च्या 22 शाळेमधून प्रथम आलेल्या प्रगती मेश्राम तसेच कौशल्या नगर सीएलसी मधील दीक्षांत इंगोले या दोघांचा सत्कार करण्यात आला असून प्रगती मेश्राम हिला 92% गुण मिळाले. तर दीक्षांतला 95 टक्के गुण मिळाले.
गुणवंतांच्या सत्कार कार्यक्रमाला प्रमुख अतिथी पाहुणे डॉ.मनीष कुरेकर VNIT, Engineering कॉलेज यांनी मार्गदर्शन केले. तसेच NIWCYD कोषाध्यक्ष विजय चिचखेडे उपस्थित होते. ह्यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रगतीने आणि दीक्षांतने आपले मनोगत व्यक्त करतात community life centre च्या कार्यक्रमामुळे व्यक्तिमत्त्वाला पैलू पडले.

असे सांगितले तसेच VNIT च्या विद्यार्थ्यांच्या शिकवणीमुळे फायदा झाला. HCL फाउंडेशनच्या आर्थिक साह्याने कार्यक्रम पार पडला असून HCL फाउंडेशनचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमात मासूम संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रोहिणी भालेराव यांनी तर डॉ. मनिष कुर्रेकर यांनी प्रास्ताविक केले व कालभूत यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोहिणी भालेराव, वर्षा दुर्वे, संदीप देऊळकर, यांनी अथक परिश्रम घेतले. विशेष म्हणजे न्यू सिड संस्थांचे मार्गदर्शन अध्यक्ष राजेश मालविया यांचे कार्यक्रमाला सहकार्य लाभले.


