सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

नागपूर शहरातील काही महत्वाच्या घडामोडी अवश्य बघा आणि वाचा…

जेईई मेन परीक्षेत महाराष्ट्रातून नागपूरचा अद्वय क्रिष्णा प्रथम

नागपूर : नॅशनल टेस्टिंग एजंसी (NTA) ने जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. जेईई मुख्य परीक्षा- 2022 सत्र एकचा जाहीर केलेल्या निकालात महाराष्ट्रातून नागपूरचा अद्वय क्रिष्णा हा प्रथम आला आहे. त्याला 99.99 टक्के मिळाले आहेत.

00000

प्लास्टिक विरुध्द मनपाची धडक कारवाई

नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मनपाच्या उपद्रव पथकाने सोमवारी १८ प्रतिष्ठानांवर कारवाई केली. १ लाख ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. मनपा आयुक्त व प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरुनगर, गांधीबाग, सतरंजीपूरा, लकडगंज, आशीनगर आणि मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात १५ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ८० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच ९० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.

00000

२१ कोरोना बाधित रुग्णालयात भरती, सक्रिय ८०९

नागपूरः जिल्ह्यात सोमवारी प्राप्त अहवालानुसार ६७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. यात नागपूर शहरातील ५७ तर ग्रामीण भागातील १० रुग्णांचा समावेश आहे. आजच्या कोरोना बाधितांसह जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या ८०९ वर पोहोचली आहे. यापैकी २१ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

000000

मनपाने केले ४ हजार ५१३ घरांचे सर्वेक्षण, डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना

नागपूर : डेंग्यूचा संसर्ग वाढू नये यासाठी नागपूर शहरात मनपाद्वारे झोननिहाय सर्वेक्षण कार्य सुरू आहे. सोमवारी ११ जुलै रोजी शहरातील दहाही झोन मध्ये ४ हजार ५१३ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. डेंग्यू प्रतिबंध अभियानांतर्गत मनपाच्या आरोग्य चमूद्वारे डेंग्यू बाधितांच्या निवासस्थानाजवळील परिसरामध्ये सर्वेक्षण करून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. धरमपेठ झोनमध्ये डेंग्यूचा एक संशयित रुग्ण आढळला आहे.

0000000

संशय आला अन् तिने पतीला प्रेयसीसह रंगेहाथ पकडले

नागपूरः गेल्या काही दिवसांपासून नागपूर जिल्ह्यातील लॉज विविध कारणांमुळे चर्चेत आहे. त्यात पुन्हा सावनेर शहरातील लॉजवरील घटनेची भर पडली आहे. या लॉजवर पत्नीने आपल्या पतीला त्याच्या प्रेयसीसोबत रंगेहात पकडले. प्रकरण पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचले मात्र आपसी समझौता झाल्याने प्रकरणाची नोंद झाली नाही.

0000000

मनपाचा निर्देश गणेश मूर्तीची उंची चार फुट, घरगुती गणेश मूर्तीची उंची दोन फुटांपेक्षा जास्त नको !

नागपूर : महापालिकेने यंदाही सार्वजनिक गणेश मूर्तीची उंची चार फुटांपेक्षा तर घरगुती गणेश मूर्तीची उंची दोन फुटांपेक्षा जास्त नको असे निर्देश काढले आहेत. त्यामुळे गणेश मंडळांसह मूर्तीकारांमध्ये कमालीची नाराजी निर्माण झाली आहे. तर भाजपनेही या प्रकरणात उडी घेत महापालिकेने उंचीच्या संदर्भात घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे.

0000000

नाल्याला आलेल्या पुरात आईसह मुलगी गेली वाहून

नागपूर: हिंगणा येथील भीमनगर इसासनीच्या नाल्याला आलेल्या पुरात आई मुलगी वाहून गेली आहे. सुकवन राधेलाल मातरे (वय 42)आणि त्यांची 17 वर्षीय मुलगी अंजली राधेलाल मातरे असे वाहुन गेलेल्यांचे नावे आहेत.

00000000

चंद्रभागा नदीत बुडाले नागपूरचे दोन तरुण

नागपूर : आषाढी एकादशीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या नागपूर येथील दोन तरुणांचा चंद्रभागेच्या पात्रात पाण्याचा अंदाज न आल्याने दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे. चंद्रभागा नदी येथील जुन्या दगडी पुलाजवळ हि घटना घडली. मृत्यू झालेले दोन्ही तरुण नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील आहेत. सचिन शिवाजी कुंभारे (28, रा. जलालखेडा), विजय सिद्धार्थ सरदार (27, रा. भारसिंगी) अशी मृत तरुणांची नावे आहेत.

0000000

नागपुरमधील ड्रग्सचे ‘बदलापूर कनेक्शन !

नागपूरः शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 25 लाख रुपये किंमतीचे एमडी पावडर हे ड्रग्स जप्त केले आहे. यात एका तडीपार आरोपीलाही अटक करण्यात आली आहे.
तस्करांकडून मोठ्या प्रमाणात एमडी पावडरचा सौदा होणार असल्याची गुप्त सूचना नागपूर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे खापरी परसोडी येथील महेश रेस्टॉरंटसमोर तैनात केले. आरोपी तेथे आले असता त्यांच्या कारची व त्यांची झडती घेण्यात आली. त्यांच्याकडे 250 ग्राम वजनाची एमडी पावडर आढळली.

00000000

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची महत्वपूर्ण घोषणा, नागपुरात धावणार ब्रॉडगेज मेट्रो!

नागपूर : शहरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. नागपुरातून लवकरच काही महत्वाच्या शहरापर्यंत १४० किलोमीटर ताशी वेगाने ब्रॉडगेज मेट्रो धावणार आहे, या प्रकल्पाला रेल्वे बोर्डाची देखील मंजुरी मिळाल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. ते नागपूरमध्ये काही विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलत होते.

0000000000

 

 

 

- Advertisment -