खासदार संजय राऊत आज नागपूरात
नागपूर : शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत आज गुरुवार (१४ जुलै) रोजी नागपूरात येत आहेत. त्यांच्या कार्यक्रमा संदर्भात जिल्हा प्रमुखांना अध्याप माहिती नाही. सध्या शहर शिवसेनेत आंतरीक वाद वाढलेला आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्या नंतर प्रथमच संजय राऊत नागपूरात येत आहेत.
नागपूरात कोरोनाचा आकडा २००, शाळकरी मुलांचा समावेश !
नागपूरात कोरोनाचा जोर वाढला. संख्या २०० च्या घरात पोहचली. तब्बल १२१ दिवसानंतर अचानक कोरोनाच्या रुग्न संख्येत वाढ झाली. या आकड्यांमध्ये शाळकरी मुलांचा अधिक समावेश आहे.
तीन लाचखोर अंगनवाडी सेविका ACB च्या जाळ्यात
नागपूर : बचत गटांच्या अध्यक्षांपासून पोषण आहार वाटपाच्या बदल्यात तीन अंगनवाडी सेविकांनी लाच मागितली. ACB च्या पथकाने लाचखोर अंगनवाडी सेविका सिमा राजेश राऊत (४७), मंगला प्रकाश प्रधान (४६), उज्वला भालचंद्र वासनिक (५१) यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले.
मागिल २४ तासात पावसाने १० जणांचा बळी घेतला
नागपूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. नदी, नाल्यांना उफान आले आहे. त्यामुळे जिल्ह्यासह शहराचे जनजीवन अस्तव्यस्त झाले आहे. धरण तुडूंब भरल्याने त्याचे दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावे पाण्यात बुडण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली असून नदी-नाल्याच्या काठावर असलेल्या वसत्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मागिल २४ तासात पावसाने १० जणांचा बळी घेतला आहे.
मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचा ‘ईडी’ ला मोठा धक्का
PMLA कायद्याअंतर्गत अटक केलेल्या एका आरोपीचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मान्य केला आहे. अजय कुमार बाहेती, राहणार नांदेड असे जामीन मिळालेल्या आरोपीचे नाव आहे. गेल्या काही काळात ईडीच्या अनेक प्रकरणामध्ये न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. मात्र या प्रकरणामध्ये HC ने जामीन दिल्यामुळे’ईडी’ला मोठा धक्का बसला आहे.