प्रभाग ६ मध्ये वंदना चांदेकर यांनी ८ कोटींचा विकास केला !
नागपूर : नगरसेविका असावी, तर वंदना राजू चांदेकर यांच्या सारखी असावी, असा सुरु प्रभागातील नागरिकांचा आहे. चांदेकर ताई ला केव्हा ही फोन केला तर त्या समस्या सोडविण्यासाठी’अपडेट’असतात. आज त्यांच्या नगरसेवकाचा कार्यकाल संपला असला तरी त्या आजही परिसराच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर असतात, असे प्रभागातील नागरिकांनी सांगितले.
प्रभागाचा दौरा या कार्यक्रमा अंतर्गत ibmtv9 न्यूज च्या टीम ने प्रभाग ६ चा दौरा केला. मिलिंदनगर, पचकुवा, वैशालीनगर, ताजनगर, बाबा बुद्धाजी नगर, सुजातानगर, हनुमान सोसायटी, वैशालीनगर झोपडपट्टी आदी परिसराची पाहणी केली असता या भागात अनेक विकास कामे वंदना राजू चांदेकर यांच्या विकास निधीतून करण्यात आले. वसाहतीतील काही समस्या सुटल्या काही समस्या प्रलंबित आहेत.
चार नगरसेवक बसपाचे असताना सदैव जनतेच्या सेवेत वंदना चांदेकर मॅडमच असतात. असे नागरिकांनी सांगितले. पाण्याचा प्रश्न, गडरलाईनचा प्रश्न, ड्रेनेज लाईनचा प्रश्न, रस्त्याची समस्या, विद्युत खांबाची समस्या, गार्डनचे सौंदर्यिकरण आदींचा विकास माजी नगरसेविका व माजी आसीनगर मनपा झोन सभापती वंदना चांदेकर यांनी केला असल्याचे प्रभागातील नागरिकांनी सांगितले. नविन प्रभाग रचने नुसार प्रभाग ६ आता प्रभाग १० झाला असून वंदना चांदेकर मॅडमच नगरसेविका असावी, असा सुरु प्रभागातील नागरिकांचा होता.