अभिमान महिला अर्बन क्रेडिट को.ऑप सोसायटी ची मेडिकल चौक येथे नविन शाखा, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी ने केले उद्घाटन
नागपूर : अभिमान महिला अर्बन क्रेडिट को. ऑप. सोसायटी ने मेडिकल चौक येथे आपली नविन शाखा उघडली आहे. या शाखेचे नुकतेच उद्घाटन नागपूर चे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्धाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून चंद्रशेखर बावनकुळे, भाजप शहर अध्यक्ष प्रवीण दटके, दक्षिणचे आमदार मोहन मते, माजी आमदार मिलिंद माने, माजी नगरसेवक संदीप गवई उपस्थित होते.
अभिमान महिला अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी शाखेचे पहिल्यांदाच उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या मंगल सोहळ्याला शाखेचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थिती होती. उपरोक्त सोसायटीचे सीईओ वीरेंद्र मेश्राम तसेच अध्यक्षा रुचिका खेरकर आणि उपाध्यक्षा वैशाली शेन्डे यांच्या नेतृत्वात कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. प्रास्ताविक रुचिका खेरकर तर संचालन उषाताई बौद्ध यांनी केले. वीरेंद्र मेश्राम यांनी मान्यवरांचे आभार मानले.


