सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

नागपूरात डिजीटल मीडियाची नवी क्रांती, प्रेस क्लब ठरले साक्षी !

नागपूरात डिजीटल मीडियाची नवी क्रांती, प्रेस क्लब ठरले साक्षी !

नागपूर : येथील डिजीटल मीडियाने नवी क्रांती केली आहे. नागपूर प्रेस क्लब हॉल त्याला साक्षी ठरले आहे. डिजीटल मीडियाच्या पत्रकारांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. आता डिजीटल मीडियाच्या पत्रकारावर कोणी बोट उचललेतर त्याच्या पाठीशी संघटना पूर्ण ताकतीने उभी राहणार आहे.

रविवार (३१ जुलै) रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास नागपूर प्रेस क्लब येथे नागपूर डिजीटल मीडिया न्यूज पोर्टल संघाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे, सिनियर रिपोर्टर आशुतोष पाठक, सरकारनामा न्यूज पोर्टलचे विदर्भ ब्यूरो चिफ अतुल मेहरे, समाजसेवक अविनाश काकडे, WH न्यूज चे संपादक विजय खवसे, IBMTV9 चे भीमराव लोणारे यांनी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले.

प्रकाश पोहरे सर यांनी डिजीटल मीडियाच्या पत्रकारांना आपल्या संबोधनातून नवी उर्जा व बळ दिला. डिजीटल मीडियाची देशात महत्व काय हे पोहरे सर यांनी पटवून सांगितले. माझी संपूर्ण ताकद डिजीटल मीडिया पत्रकारांच्या पाठीशी आहे, असेही ते बोललेत.

दिल्लीचे सिनियर रिपोर्टर आशुतोष पाठक हे बैठकीला ऑनलाइन उपस्थित होते. त्यांनी डिजीटल मीडिया पत्रकारांच्या मनात असलेली भिती काढण्याचा प्रयत्न केला. कुण्या अधिकाऱ्याला किंवा पोलीस प्रशासनाला घाबरायची गरज नसल्याचे डिजीटल मीडियाच्या पत्रकारांना सांगितले. कुणीजर दबाव बनविण्याचा प्रयत्न करीत असेल तर माझ्याशी संपर्क करा असे म्हटले. आणि आपला मोबाईल नंबर शेयर केला. यावेळी उपस्थित असलेल्या डिजीटल मीडियाच्या पत्रकारांनी आशुतोष पाठक यांच्या समोर आपल्या व्यथा मांडल्या होत्या.

सरकारनामा या न्यूज पोर्टलचे विदर्भ ब्यूरो चिफ अतुल मेहरे सर यांनी या क्षेत्रात सुरुवातीला काम करताना कसा त्रास झाला हे सांगितले. आता सरकारनाच्या बातम्यांकडे मुख्यप्रवाहातील मीडियाचे लक्ष असते, असेही ते बोललेत. डिजीटल मीडियाचे महत्व कसे वाढले, हे त्यांनी पटवून सांगितले. आपली स्पर्धा कुणाशी नाही. प्रामाणिक पणे काम करावे. मनात कुठलीही भिती न बाळगता बिनधास्त काम करा. कारण आता तुमच्या पाठीशी संघटना उभी आहे, असे अतुल मेहरे सर यांनी सांगितले. समाजसेवक अविनाश काकडे, भुयार सर यानी डिजीटल मीडियाच्या पत्रकारांचे महत्व काय हे सांगितले. तसेच प्रकाश पोहरे सरांची साथ डिजीटल मीडियाच्या पत्रकारांना नवी ताकद देणार असल्याचेही ते बोललेत. कार्यक्रमाला नागपूरातील ७० च्या जवळपास डिजीटल मीडियाचे पत्रकार उपस्थित होते. संचालन नागपूर डिजीटल मीडिया न्यूज पोर्टल संघाचे अध्यक्ष भीमराव लोणारे यांनी केले. सचिव विजय खवसे यांनी आभार मानले.

 

 

 

- Advertisment -