सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

वाडी परिसरात शिवसेनेचे आंदोलन

वाडी परिसरात शिवसेनेचे आंदोलन

खा. संजय राऊत यांच्यावर ईडी ने केलेल्या कारवाईचा केला निषेध

नागपूर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीचे कारवाई सुरू झाल्यानंतर राज्यभरात शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरच्या वाडी परिसरात देखील शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी ईडी विरोधात घोषणाबाजी करण्यात येऊन कारवाई मागे घेण्याची मागणी यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली. हिंगणा विधानसभेचे सहसंपर्क प्रमुख दिवाकर पाटणे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणी ईडीने कारवाई केली आहे. ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे. ईडीने सुड भावनेने हि कारवाई केली, असल्याचा आरोप वाडीतील शिवसैनिकांनी केला आहे. केंद्र सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला. खासदार संजय राऊत यांच्यावरील कारवाईला राज्यभरातून विरोध होताना दिसत आहे.

राज्यभर आंदोलन करण्यात आले. वाडीच्या शिवसैनिकांच्या आंदोलनात शिवसेना हिंगणा विधानसभा क्षेत्राचे सहसंपर्क प्रमुख दिवाकर पाटणे, वाडी शहर प्रमुख मधु माणके पाटील, तालुका प्रमुख संजय अनासने, तुषार डेरकर, जगदीष कन्हेर, राजेन्द्र कोल्हे, रचना कन्हेर, अनिता ढाकरे, चित्रा सायने, सुकन्या थळकर, दिनेश तिवारी, उमेश महाजन, विलास भोंगडे, नरेश मसराम, सचिन पाटील, विजय फुलसुंगे, अक्षय राऊत, तारुश बांद्रे,  प्रमोद जाधव, पुरुषोत्तम गोरे, शिवम राजे, गौरव उगले, अजय देशमुख, कमल तायडे, गुलशन शेंडे, दिवाणजी रहांगडाले, तारुष बांदरे, संतोष कान्हेरकर, अमित सावरकर, हसन राजा व युवा सेनेचे अखिल पोहनकर, सचिन बोंबले, धनराज लांडगे, सुबोध जांभूळकर, विगणेश तेलूटे, रुपेन्द्र फूले, आदर्श अभ्यंकर, भोजराज भोंगडे, राजू घवघवे, चंद्रशेखर येवले, साहेबराव बोवाडे, चंद्रशेखर देशभ्रतार, भय्याजी सातपुते, सद्धाम शेख व वाडीतील शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -