बावनकुळे 30 ऑगस्टला प्रदेश कार्यालयात
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे हे मंगळवार, दि. 30 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत पक्षाच्या मुंबईस्थित नरिमन पॉईंट येथील प्रदेश कार्यालयात कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सामान्य जनतेसाठी उपस्थित असणार आहेत.
ज्यांना प्रदेशाध्यक्ष महोदयांना भेटायचे आहे, त्यांनी दुपारी 1 ते सायंकाळी 6 या वेळेत भेटायला यावे, आपली निवदने, पत्रे द्यावीत. आपली काही समस्या असेल तर ती तोंडी न सांगता कागदावर लिहूनच द्यावी.
वेळेचा सदुपयोग व्हावा यादृष्टीने कुणीही पुष्पगुच्छ वा पुष्पहार, शाल-श्रीफळ आणून स्वागत-सत्कार करू नये. जनतेशी संवाद साधता यावा, कार्यकर्त्यांच्या भावना ऐकता याव्यात आणि पदाधिकार्यांशी चर्चा करता यावी, हा मा. प्रदेशाध्यक्षांच्या संवाद कार्यक्रमाचा उद्देश आहे.