सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

धम्ममय वातावरणात मॅडम नोरीको ओगावा यांना भावपूर्ण आदरांजली

धम्ममय वातावरणात मॅडम नोरीको ओगावा यांना भावपूर्ण आदरांजली

प्रमुख भिक्षु संघाच्या उपस्थितीत महापरित्राण पाठ पुण्यानुमोदन व धम्मदेसना संपन्न

कामठी : स्मृतिशेष महादानदायीका मॅडम नोरीको ओगावा यांच्या तृतीय स्मृति दिना निमित्त शुक्रवार दिनांक २ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ९ : ०० वाजता विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे प्रमुख भिक्षु संघाच्या उपस्थितीत महापरित्राण पाठ व पुण्यानुमोदन कार्य क्रम शेकडो बौध्द उपासक- उपासिकांच्या उपस्थित धम्ममय वातावरणात संपन्न झाले.

उल्लेखनीय आहे की , जपान येथील महाउपासिका मॅडम नोरीको ओगावा यांच्या धम्मदानातुन कामठी शहरात विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल उभारण्यात आले . ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे शांती , मैत्री व मानव कल्याणकारी विचाराचे केंद्र म्हणून जगप्रसिध्द आहे . तसेच ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे जपान येथील मॅडम नोरीको ओगावा व भारतातील एड. सुलेखाताई कुंभारे यांच्या जपान – भारत मैत्रीच प्रतिक म्हणून सुध्दा ओळखल्या जात आहे .

नागपूर येथील पवित्र दिक्षाभुमी सोबतच ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे बौध्द टुरीष्ट सर्कीट मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे . मॅडम नोरीको ओगावा यांच्या तृतीय स्मृति दिना निमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे पुज्य भिक्षु संघाच्या वतीने सर्व प्रथम ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथील तथागत गौतम बुध्दांच्या मुर्ती समोर मेणबत्ती व उदबत्ती लावून वंदना घेण्यात आली.

पुज्य भदंत महापंत महास्थविर , रामदेगी- चंद्रपूर येथील पुज्य  भदंत ज्ञानज्योती महाथेरो, म्यानमार येथील पुज्य भदंत जटीला महाथेरो , अरुणाचल प्रदेश येथील पुज्य भदंत वन्नास्वामी महाथेरो , दिक्षा भुमी स्मारक समितीचे सदस्य पुज्य भदंत नागदिपंकर स्थविर , पुज्य भदंत ज्ञानबोधी स्थविर पुज्य भदंत डॉ . सीलवंस स्थविर , पुज्य भदंत कविचिंदा स्थविर , पुज्य भदंत मेत्तानंद , पुज्य भदंत प्र ज्ञाज्योती शेरो , पुज्य भदंत सुगाता पुज्य भदंत अगधम्मा , पुज्य भदंत नंदीता यांच्या वतीने मॅडम नोरीको ओगावा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून भिक्षु संघातर्फे मॅडम नोरीको ओगावा यांना आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी एड. सुलेखाताई कुंभारे यांनी जपानी पध्दतीने चॅटींग करून मॅडम नोरीको ओगावा यांना आदरांजली वाहली. पुज्यनिय भिक्षु संघाच्या वतीने महापरित्राण पाठ व पुण्यानुमोदन करण्यात आले .

पुज्य भदंत महापंत महास्थविर व पुज्य भदंत ज्ञानजोती महाथेरो यांनी उपस्थित उपासक – उपासिकांना धम्मदेसना दिली . त्यामुळे संपूर्ण वातावरण धम्ममय झाले होते . त्यानंतर ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा व माजी राज्यमंत्री एड. सुलेखाताई कुंभारे यांच्या वतीने उपस्थित पुज्यनिय भिक्षु संघाला चिवरदान, भोजनदान देण्यात आले.

ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे आयोजित मॅडम नोरीको ओगावा यांच्या स्मृती दिना निमित्त मोठया संख्येने उपासक – उपासिकांची उपस्थित होते.

ओगावा सोसायटी , डॉ . बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र , हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था , दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण संस्था , ड्रॅगन पॅलेस विपस्सना मेडीटेशन सेंटर , ड्रॅगन इंटरनॅशनल स्कूल , ओगावा इंटरप्रायजेस प्रा.लि. यांच्या पदाधिकारी , शिक्षकवृंद धम्मसेवक- धम्मसेविका व ड्रॅगन पॅलेस टेम्पलचे मैत्री संघाचे उपासक – उपासिकांनी मॅडम नोरीको ओगावा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहली.

- Advertisment -