वंचित बहुजन आघाडीतर्फे “मतदार कार्ड – आधार कार्ड लिंक’ शिबिराचे आयोजन
नागपूर : वंचित बहुजन आघाडीतर्फे मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन उद्घाटन शहर अध्यक्ष रवी शेंडे यांच्या हस्ते झाले.
लष्करीबाग, आवळे बाबू चौक येथे सदर शिबिराचे आयोजन पक्षाचे शहर सचिव प्रा. रूपेंद्र खांडेकर व शहर महिला उपाध्यक्ष नलिनी खांडेकर यांनी केले. या प्रसंगी मनपा शाळेतील शिक्षकांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रामुख्याने पूर्व विदर्भचे संयोजक भगवान भोंडे, शहर महासचिव इंजी. राहुल दहिकर, उत्तर नागपूरचे अध्यक्ष प्रविण पाटील, शहर महिला महासचिव वंदना पेटकर, रजनी सुमित चव्हाण, सुनीता नाईक, माया रामटेके, आनद लांजेवार, मदन पाटिल, सुमित चव्हाण, चेतन गौर, संगपाल गाडेकर, प्रशांत बोदेले, मयुर मंडाले, प्रभाग १३ चे अध्यक्ष जयवर्धन मेश्राम, चंद्रमणी नंदागवळी, आनंद बोरकर, डी. डी. बंसोड, विनित मेश्राम, बबनराव बंसोड व अनेक पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.
—