दाऊदी बोहरा समाजाची जागतिक सेवाभावी शाखा वर्ल्ड व्हिजन इंडियासोबत
यवतमाळ , महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे चरितार्थाचे साधन टिकवून ठेवण्याचा एक प्रयत्न म्हणून जलसंधारणाचे कामे केली
नागपूर : दाऊदी बोहरा समाज आणि वर्ल्ड व्हिजन इंडिया यांनी आज त्यांच्या प्रोजेक्ट राईज वॉटर सिक्युरिटी अँड फार्मर लिफ्टमेंट प्रोग्राम चे यश आणि प्रभाव दाखवण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे . या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातील चिंचघाट , वडनेर , मार्थड आणि शिवणी या चार ग्रामीण पावसावर अवलंबून असलेल्या गावांतील नुकसानग्रस्त शेतकरी समुदायाला , प्रामुख्याने शेतीवर चरितार्थ असणाऱ्या 1,000 हून अधिक कुटुंबांपर्यंत पौहचून आधार दिला आहे.
शेतकरी आणि दाऊदी बोहरा समाज या त्यांच्या भागीदाराच्या प्रयत्नांची प्रशंसा करताना , श्री . सोनी थॉमस , ग्रुप डायरेक्टर रिसोर्स मोबिलायझेशन अँड पब्लिक एंगेजमेंट , वर्ल्ड व्हिजन इंडिया , म्हणाले , ” भारतातील बहुतांश ग्रामीण जनता पावसावर अवलंबून असून त्यांचा चरितार्थ तुटपुंजा तसेच अनिश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या कृषी अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे . मातीची गुणवत्ता तर खालावली आहेच त्याचबरोबर जलस्रोत कमी झाल्यामुळे त्यांची दुर्दशा वाढली आहे.
महाराष्ट्रातील यवतमाळच्या शेतीवर आणि शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाच्या प्रमुख साधनावर सकारात्मक परिणाम करणारा पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम राबवण्यासाठी दाऊदी बोहरा समाजासोबत भागीदारी केल्याचा आम्हाला आनंद होत आहे . या कुटुंबांसाठी शाश्वत उपजीविका निर्माण झाल्याने मुलांचे सर्वांगीण विकास होईल आणि मुलांना उज्वल भविष्य देखील मिळेल असा आमचा विश्वास आहे.
श्रोत्यांना संबोधित करताना श्री शब्बीर नजमुद्दीन , प्रोजेक्ट राईज वरिष्ठ अधिकारी आणि बुरहानी फाउंडेशनचे उपाध्यक्ष म्हणाले , ” हवामान बदलाच्या संकटामुळे जगभरात दुष्काळ आणि पूर यांसारख्या पाण्याशी संबंधित आपत्ती उद्भवत आहेत . जलस्रोतांची कमतरता , ही विदर्भात , विशेषतः शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी मोठी चिंतेची बाब आहे . पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी आणि या भागातील लोकांना चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी चार गावांमध्ये हा दीर्घकालीन पाणलोट व्यवस्थापन प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल आम्हाला विशेष अभिमान वाटतो.
तैयब खान , पुढे म्हणाले, समाजाचे धर्मगुरू , सैयदना मुफद्दल सैफुद्दीन हे आम्हाला नेहमीच मदतीचा हात देण्याचा आणि