डॉ. ब्रिजेश दीक्षित यांना इंजिनियर फोरम द्वारे विशेष जीवन गौरव पुरस्कार
मला मिळालेला हा सम्मान महा मेट्रोच्या संपूर्ण टीमला समर्पित: डॉ. दीक्षित
नागपूर : २४ घंटे ७ दिवस महा मेट्रोच्या टीमने न थांबता निर्धारित लक्ष्य पूर्ण करत नागरिकांना उत्तम पर्यावरणपूरक मेट्रो सेवा शहरातील नागरिकांना प्रदान केली ज्या करता मी सर्व नागपूरकरांचे तसेच संपूर्ण टीमचे अभिनंदन करत असल्याचे प्रतिपादन डॉ. दीक्षित यांनी केले ते इंजिनियर फोरम द्वारे इंजिनियर दिनाच्या औचित्याने आयोजित कार्यक्रमामध्ये बोलत होते. या कार्यक्रमामध्ये महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांना विशेष जीवन गौरव पुरस्कार प्रदान करत त्यांचा सम्मान करण्यात आला. डॉ. दीक्षित यांना इन्फ्रास्ट्रकचर क्षेत्रात अतुलनिय कामगिरी करता हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला आयआयटी मुंबईचे प्राध्यापक पद्मश्री. डॉ. दीपक पाठक, नीरीचे संचालक डॉ. अतुल वैध, इंजिनियर फोरमचे अध्यक्ष श्री. प्रकाश कुळकर्णी, सचिव श्री. केशव तायडे प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. दीक्षित यांनी सांगितले कि,सर्वांच्या सहकार्याने महा मेट्रोने निरंतर कार्य करत लक्ष्य पूर्ण केले. शहरामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अतिशय कठीण होती, ज्यामध्ये प्रदूषण, दुर्घटनामुळे नागरिकांना त्रास व्हायचा या सर्व गोष्टी लक्षात ठेवत सुविधाजनक परिवहन साधन उपलब्ध करून देण्याकरता नागपूर, पुणे या शहरामध्ये मेट्रो सेवा निर्माण करण्याकरता नियोजन करण्यात आले ज्याला आता यश देखील मिळाले आहे. महा मेट्रोने २५ महिन्यात ५० किमी चे मेट्रो नेटवर्क पूर्ण केले करत प्रवासी सेवा नागरिकांन करता उपलब्ध केली आहे. महा मेट्रोचे सौभाग्य आहे कि, नागरिकांच्या सहकार्यामुळे निर्माण कार्य करणे अतिशय सुरळीत झाले. या प्रसंगी डॉ. दीक्षित यांनी भारत सरकार, महाराष्ट्र शासन, स्थानिक स्वराज्य संस्थाचे सहकार्या बद्दल धन्यवाद दिले.
डॉ. दीक्षित या कार्यक्रमाला आभासी पद्धतीने उपस्थित होते ते एशियन डेव्हलपमेंट बँक द्वारे आयोजित कॉन्फ्रस करता त्या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे डॉ. दीक्षित यांच्या वतीने महा मेट्रोचे संचालक(स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग) श्री. अनिल कोकाटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
• *पद्मश्री डॉ. दीपक पाठक (प्राध्यापक – आयआयटी, मुंबई):* डॉ दीपक पाठक यांनी महा मेट्रोच्या ५ डी- बीमच्या व्यापक वापराविषयी सांगितले. ”मी ५ डी- बीम वर कार्य करणाऱ्या टीमचा एक भाग म्हणून महा मेट्रोशी निगडीत होतो. महा मेट्रोने बचत करत प्रकल्प अंमलबजावणीत क्रांती घडवून आणली आहे. डॉ. दीक्षित यांनी मेट्रो रेल प्रकल्पात ५ डी- बीम आणण्याचा निर्णय घेत मेट्रो प्रकल्प राबविताना इतका मोठा निर्णय घेण्याच्या भूमिकेचे त्यांनी यावेळी कौतुक केले.
डॉ. दीक्षित यांना या पूर्वी आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे आयोजित `इंटरनॅशनल रेकॉर्डस् फेस्टिव्हल – २०२२ पुरस्कार, जिओ स्पॅशियल वर्ल्ड तर्फे एक्सलंस मेट्रो प्रकल्प अवॉर्ड,इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ब्रिज इंजनियर्स द्वारे लाईफ जीवन गौरव पुरस्कार, भामाशा आदी पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे.
डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी या पुरस्कार करता त्यांची निवड करण्याकरिता इंजिनियर फोरमच्या संपूर्ण टीमला धन्यवाद दिले.