सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

गोरेवाडा रेस्क्यू सेंटरला वाघ पंधरा पिंजरे दहा !

गोरेवाडा रेस्क्यू सेंटरला वाघ पंधरा पिंजरे दहा !

नागपूर : विदर्भात वन्यजीवांसाठी प्रमुख समजल्या जाणाऱ्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरला सध्या कमी पिंजऱ्यांची समस्या भेडसावत आहे. वाघांची संख्या पंधरा अन पिंजरे मात्र दहा आहेत. १३ जणांचा बळी घेणाऱ्या सी-1 नावाच्या वाघाला येथे आणण्यात आल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या नरभक्षी वाघाला ठेवण्यासाठी प्रशासनाकडे पिंजरे नव्हते. शेवटी या वाघाला अस्वलाच्या रिकाम्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहे.

अस्वलांची संख्या कमी झाल्यामुळे हे शक्य होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे, मात्र ही संख्या वाढतच चालली असली तरी या वाढीला प्रशासन कसे सामोरे जाणार, हा मोठा प्रश्न आहे. बिबट्यांची संख्या गोरेवाडा बचाव केंद्रात २५ आहे. मात्र पिंजरे फक्त २० आहेत. वाघ आणि बिबट या वन्य बचाव केंद्रात कसे अधिवासात आहेत, हा शोधाचा विषय आहे.

नवीन पिंजऱ्यांसाठी प्रशासनाकडून प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, मात्र अद्याप परवानगी मिळालेली नाही. गोरेवाडा बचाव केंद्र केवळ नागपूर जिल्ह्यापुरते किंवा विदर्भापुरते मर्यादित नाही. राज्यभरातून वन्यजीव या वन्यजीव बचाव केंद्रात आणले जातात. मात्र काही वर्षांपूर्वी बांधलेल्या या रेस्क्यू सेंटरमध्ये पिंजऱ्यांची संख्या आजही तेवढीच आहे, तर सध्या वन्यप्राण्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्याचबरोबर मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षही वाढत आहे. यासाठी दर एक-दोन महिन्यांनी वाघ आणि बिबट्या आणले जातात. नवीन पिंजऱ्यांची मागणी गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्राच्या प्रशासनाने केली आहे.

- Advertisment -