सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

‘आयुर्वेद पर्व’व आंतरराष्ट्रीय परिषद ११ ते १३ नोव्हेंबर दरम्यान

भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने नागपुरात आयोजन

सरसंघचालक डॉ . मोहनजी भागवत यांच्या हस्ते उद्घाटन

राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैद्य देणार मोफत रुग्णसेवा

नागपूर : हजारो वर्षांपासूनच्या शाश्वत , प्रभावी अणि उपयुक्त अश्या आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तसेच , आयुर्वेदाच्या वैज्ञानिक दृष्टीने सेवा , संशोधन व शिक्षण देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या आयुर्वेद व्यासपीठच्या रजत जयंती वर्षानिमित्त 11 ते 13 नोव्हेंबर दरम्यान ‘ आयुर्वेद पर्व ‘ आणि आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे .

भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने कविवर्य सुरेश भट सभागृह , रेशीमबाग , नागपूर येथे होत असलेल्या या चर्चासत्राचे उद्घाटन शनिवार , 12 रोजी सकाळी 10.30 वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मा . डॉ . मोहनजी भागवत यांच्या हस्ते होणार आहे . या कार्यक्रमाला आयुष मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री मा.सर्वानंद सोनोवाल , सचिव पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा , भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाचे सभापती वैद्य जयंत देवपुजारी व श्री धूतपापेश्वरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रणजीत पुराणिक यांची उपस्थिती लाभणार आहे .

आदल्या दिवशी शुक्रवार , 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता उपमुख्यमंत्री मा . श्री . देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रुग्ण चिकित्सा शिबिर व आरोग्य प्रदर्शनीचे उद्घाटन होणार आहे . यावेळी आयुष मंत्रालयाचे आयुर्वेद सल्लागार वैद्य मनोज नेसरी , राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ नवी दिल्लीचे अध्यक्ष पद्मभूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा , आयुष महाराष्ट्रचे संचालक वैद्य के राजेश्वर रेड्डी व श्री रणजीत पुराणिक यांची उपस्थिती राहील . शनिवार दि १२ नोव्हेंबर रोजी आयुष मंत्रालयाचे वैद्य श्री कौस्तुभ उपाध्याय यांच्या उपस्थितीत आयुर्वेदीय औषधी निर्मात्यांचे सम्मेलन होणार आहे . रविवार , 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते परिषदेचा समारोप होईल .

वैद्य , चिकित्सक , निर्मातेही होणार सहभागी

या परिषदेला देशभरातील सुप्रसिद्ध वैद्य , कुशल चिकित्सक , विद्वान आयुर्वेद शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत . याशिवाय , भारत सरकारचे धोरणकर्ते , आयुर्वेद औषधी निर्माते , आयुर्वेद पुस्तक प्रकाशक , प्रतिष्ठित आयुर्वेद महाविद्यालयांचाही सहभाग राहणार आहे . या आयुर्वेद पर्वाचा सर्वांनी लाभ घ्यावा , असे आवाहन संस्थापक अध्यक्ष वैद्य विनय बेलणकर , अध्यक्ष वैद्य रजनी गोखले , केंद्रीय , राज्य व नागपूर विभाग कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे .

निःशुल्क रुग्ण सेवा

या तीन दिवसीय परिषदेत वैशिष्ट्यपूर्ण असा बाह्य रुग्ण विभाग राहणार आहे . यात 11 ते 13 नोव्हेंबर दरम्यान दररोज सकाळी 10 ते 1 व सायंकाळी 4 ते 7 वाजेदरम्यान भारतभरातून आलेले निष्णात आयुर्वेद चिकित्सक निःशुल्क रुग्ण सेवा देणार आहेत . बाह्य रुग्ण विभागाच्या मार्गदर्शक वैद्य मीरा औरंगाबादकर यांच्या मार्गदर्शनात स्त्रीरोग , मधुमेह , संधीविकार , त्वचा विकार , नेत्ररोग , अग्निकर्म व वेदनोपचार , मानसरोग , कर्करोग आदीचे तज्ञ वैद्य रुग्णांना तपासतील व उपचार करतील . रुग्णांसाठी ही सुवर्णसंधी असून याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा , असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे .

विविध कार्यशाळा , चर्चासत्रांचे आयोजन

तीन दिवसीय या आयोजनात नेत्रचिकित्सा , रक्तमोक्षण , जानुसंधी परीक्षण , अग्निकर्म , मर्म चिकित्सा , आयुर्वेदिय दंतोत्पाटन विषयावर कार्यशाळा होणार असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे . ‘ विदेशात आयुर्वेदाच्या संधी ‘ , ‘ आयुर्वेदातील आपात्कालीन चिकित्सा ‘ , ‘ बीएएमएसनंतर करीअरच्या संधी ‘ , ‘ वन्ध्यत्व ‘ या विषयावर चर्चासत्र होणार आहेत . याशिवाय , संशोधन आदी विषयांवर समांतर सत्रदेखील राहणार आहेत .

पत्रकार परिषदेला आयुर्वेद व्यासपीठचे संस्थापक अध्यक्ष वैद्य विनय वेलणकर , पूर्व अध्यक्ष वैद्य संतोष नेवपूरकर , अध्यक्ष वैद्य रजनी गोखले , कार्यवाह वैद्य विलास जाधव , सहकार्यवाह वैद्य राजेश गुरु , कोषाध्यक्ष वैद्य आनंद टेंभुर्णीकर , वैद्य मृत्युंजय शर्मा , वैद्य मृणाल जामदार , वैद्य श्रीकांत वणीकर , वैद्य प्रसाद देशपांडे , वैद्य हितेंद्र मैंद यांची उपस्थिती होती .

- Advertisment -