सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

संविधान चौकात आता ओबीसी समाज करणार अन्नत्याग आंदोलन !

संविधान चौकात आता ओबीसी समाज करणार अन्नत्याग आंदोलन !

 नागपूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे,१२ व्या दिवशी साखळी उपोषण संविधान चौकात सुरू आहे. या उपोषणाला , आज बसलेले ओबीसी बांधव डॉ मनोहर तांबुलकर, डॉ कीरण नेरकर, नरेंद्र लीलारे, महेंद्र उईके, माधवराव गावंडे, भास्कर भोयर, अरुण साखरकर, डॉ रत्नाकर लांजेवार, भास्कर भनारे, राकेश ईखार, कल्पना मानकर,राजु खडसे, रविंद्र आदमने, गजानन काकडे, युवराज कामडे, प्रतिमा उईके, हे आज साखळी उपोषणात सहभागी झाले.आज डॉ बबनराव तायवाडे यांनी या आंदोलनाला राज्यातील सर्व ओबीसी आमदारांनी मुख्यमंत्री यांचे कडे मागणी लावून धरणे गरजेचे आहे.

कारण त्यांना मिळणारी जास्त मते ओबीसीचीच असतात. आम्ही सर्व संवैधानिक मागण्या ओबीसी समाजाच्या प्रगतीसाठी च मागत आहोत. आज या विचार पिठावरुन शरद वानखेडे, सुरेश कोंगे,भाजप ओबीसी चे नेते नरेश बरडे, भुषण दडवे, डॉ राजेश ठाकरे, डॉ मनोहर तांबुलकर,प्रा रमेश पिसे, यांनी वर्तमानात प्रधानमंत्र्यांनी महिला विधेयक पारित करतांना, ओबीसी महिलांना त्यात न्याय मिळाला नाही. ह्यांची खंत बाळगली नाही.

म्हणून सरकारचा निषेध सुद्धा केला. या आंदोलनपीठाला अनेक लोकांनी हजेरी लावली. या निमित्ताने सर्वानुमते असे ठरविण्यात आले,की सरकारने रविवार पर्यंत चर्चेला आमंत्रित केले नाही तर , सोमवार पासून अन्नत्याग आंदोलनाची सुरुवात करणार असे डॉ तायवाडे यांनी स्पष्ट केले. या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देणारे नागपूर कामठी परदेशी धोबी समाजाचे नरेश बैस्वारे, कुणबी सेवासंघाचे पंकज पांडे, कुणबी महासंघाचे अध्यक्ष राजु भोतमांगे, कार्याध्यक्ष राजु खडसे यांनी पाठिंबा दिला. त्यानंतर श्रीकांत मसमारे यांनी उपोषणकर्त्याचे मनोगत घेतले.

या आंदोलनाला घनश्यामजी मांगे, गेमराज गोमासे,हेमंत गावंडे, गणेश नाखले, अनंता भारसाकळे, अँड प्रकाश भोयर, सुशिल ठाकरे, नाना सातपुते,शकील पटेल, प्रा संजय चौधरी,अतुल गांजरे, अविनाश घागरे,रुषभ राऊत, रितेश कढव, माजी प्राचार्य विनोद गावंडे, अरुण वराडे, यांनी कार्यक्रमाचे संचलन केले, राष्ट्रीय ओबीसी महासंघाने या उपोषणा मंडपात मोठ्या संख्येने सहभागी होऊन या आंदोलनाला प्रखर करावे असे आवाहन केले आहे.राष्ट्रगीताने आजच्या दिवसाची समाप्ती झाली.

- Advertisment -