म्युझिगलने धरमपेठ, नागपूर येथे त्यांची संगीत अकादमी सुरू केली
म्युझिगलने आज तिची पहिली अकादमी सुरू केली आणि लवकरच आणखी दोन अकादमी सुरू केल्या जातील.
म्युझिगल संघटित संगीत शिक्षण उद्योगात एक प्रमुख खेळाडू म्हणून स्वत:ला प्रस्थापित करत आहे, त्याची पोहोच वाढवत आहे आणि चांगला प्रभाव पाडत आहे
नागपूर : म्युझिगल, भारतातील संगीत शिक्षणामधील सर्वात मोठे व्यासपीठ असून, अकादमीने नागपुरमधील धरमपेठ येथे अद्ययावत अशी पहिली संगीत अकादमी सुरू केली. ही अकादमी 1300 चौ.फ़ूट जागे मध्ये पसरलेली आहे. येथे गायन तसेच वादनाचे देखील शिक्षण दिले जाणार आहे. या अकादमीच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती अमृता फडणवीस (बँकर, गायिका आणि सामाजिक कार्यकर्त्या), डॉ. तनुजा नाफडे, संशोधक, गायक आणि लेखिका आणि सन्माननीय अतिथी म्हणून श्री. उदीक्ष सूद (उपाध्यक्ष – मुझीगल) उपस्थित होते.
2020 साली सुरू झालेल्या, म्युझिगल ने थोडक्या कालावधीतच स्वत:ची संगीत शिक्षण क्षेत्रामध्ये एक ओळख निर्माण केली आहे. भारत भरात 62 पेक्षा अधिक अकादमी असून 2025 पर्यंत त्यांची संख्या 100 पर्यंत नेण्याचा त्यांचा मानस आहे. म्युझिगल संगीत शिक्षण कसे द्यावे याची एक नवीन व्याख्याच आहे जणू. धरमपेठ – नागपूर येथील अकादमी ही टॉप -टियर शहरामध्ये, 500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना विविध बॅचेसचा माध्यमाने सहभागी करून घेणार असल्याची, ग्वाही म्युझिगल देते आहे.
म्युझिगल अकादमी ही पियानो, कीबोर्ड, गिटार, ड्रम, कार्नॅटिक संगीत, हिन्दुस्तानी संगीत, पाश्चात्य संगीत, व्हायोलिन आणि उकुलेले सारख्या व्यापक श्रेणींचे शिक्षण देणार आहे. म्युझिगल संगीत शिक्षण आणि शिकवणी याबद्दल संपूर्ण माहिती देत असून, यामध्ये ऑनलाईन, ऑफ़लाईन आणि संगीत वाद्यांचा शिक्षणाचा देखील एकाच छता खाली समावेश असेल. उद्घाटन महिना म्हणून, म्युझिगल द्वारे सगळ्या सहभागी व्यक्तींना एक महिन्याचे मोफ़त संगीत शिक्षण दिले जाणार आहे, या मधून सगळ्यांनाच संगीत शिक्षण मिळावे या त्यांच्या ध्येयावर भर दिला जाणार आहे.
उद्घाटनाच्या वेळेला बोलताना, डॉ. लक्ष्मीनारायण येलुरी, म्युझिगल चा संगीत शिक्षणाचे लोकशाहीकरण करण्याचा त्यांच्या ध्येयाचा उल्लेख करत म्हणाले, “म्युझिगल अकादमी ही आमच्या ध्येयानेच प्रेरित असते आणि संगीताचे शिक्षण घेऊ इच्छीणाऱ्यांना आपल्या आजूबाजूला एक अद्ययावत केंद्र मिळावे हाच आमचा प्रयत्न असतो. या अकादमीमुळे संगीताचे उत्तम शिक्षण आणि शिकवणी मिळेल याचा आम्हाला विश्वास आहे, कारण इथे भारतीय क्लासिकल आणि पाश्चिमात्य संगीत शिक्षण हे तज्ञांकडून दिले जाते.” म्युझिगल धरमपेठ नागपूर हे शिप्रा गुगलिया आणि निकिता पाटनी यांच्या मालकीचे आहे, ज्यांनी या प्रतिष्ठित संगीत अकादमीला शहरात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
शिप्रा गुगलिया यांनी आपला उत्साह व्यक्त करताना सांगितले की, “नागपूर हे नेहमीच समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेले आणि कलेवर मनापासून प्रेम करणारे शहर आहे. म्युझिगल अकादमी धरमपेठमध्ये सुरु करून, विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा आणि तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देऊन, आमच्या समुदायातील संगीत प्रतिभा विकसित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. आम्हाला वाटते की संगीत शिक्षण प्रत्येकाला मिळायला पाहिजे आणि ही अकादमी हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
म्युझिगलचा आपला एक रचनात्मक अभ्यासक्रम, कालांतराने केले जाणारे मूल्यांकन, प्रमाणपत्र, लवचिक शुल्क देण्याचे पर्याय आणि उच्च शिक्षित प्रशिक्षक प्रदान करण्याचा दृष्टीकोन आहे. अकादमीची रचना आणि रचनात्मक उभारणी ही संगीत शिक्षण लक्षात घेऊनच केली गेली आहे, यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या संगीत प्रवासामध्ये स्पष्ट आणि सुयोग्य असा मार्ग मिळतो.
म्युझिगल उत्तम संगीत शिक्षण व्यापकपणे उपलब्ध करून देण्याची आपली वचनबद्धता प्रतिबिंबित करते. आमचे ब्रीदवाक्य “लर्न म्युझिक द राईट वे (योग्य मार्गाने संगीत शिक्षण)” असे असून यामुळे रचनात्मक आणि योग्य दृष्टीकोन ठेऊनच संगीत शिक्षण देण्याची आमची बांधिलकी दिसून येते, असे करताना प्रत्येक शिक्षार्थी वेगळा असून त्याचा शिक्षण्याचा देखील वैयक्तिक मार्ग आहे असे आम्ही मानतो.
म्युझिगलचा अभ्यासक्रम हा संगीतातील ज्ञान वाढविणाराच नसून यामुळे आकलनविषयक क्षमता आणि जीवन कौशल्य देखील सुधारतील. म्युझिगल येथील संगीत शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती,गतीप्रेरक समन्वय आणि व्यापक कौशल्य विकसित केले जाणार जातील आणि त्यांना जबाबदारी, शिस्त आणि चिकाटी सारख्या चांगल्या गोष्टी देखील शिकविल्या जातील. म्युझिगलचा असा विश्वास आहे की खऱ्या संगीतामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो आणि एखाद्या व्यक्तीला बाहेरचा जगातील आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जाता येते.