ऑल-न्यू टोयोटा अर्बन क्रूझर टेसर आहे डायनॅमिक एसयूव्ही स्टाइल, अॅडव्हान्स फीचर्स आणि पॉवर-पॅक्ड परफॉर्मन्सचे परिपूर्ण मिश्रण
नागपूर : ऑल-न्यू टोयोटा अर्बन क्रूझर टेसर ही टोयोटा किर्लोस्कर मोटारच्या भारतातील पावरफुल एसयूव्ही श्रेणीतील नवीन उत्पादन आहे. ही डायनॅमिक एसयूव्ही स्टाइल, अॅडव्हान्स फीचर्स आणि पॉवर-पॅक्ड परफॉर्मन्सचे परिपूर्ण मिश्रण आहे, ज्यामुळे प्रतिष्ठा आणि व्यावहारिकता या दोन्ही गोष्टी शोधणाऱ्या भारतीय ग्राहकांसाठी ती एक योग्य निवड बनते.
आधुनिक स्टाइल आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासह, अर्बन क्रूझर टेसर टोयोटाच्या एसयूव्ही श्रेणीतील प्रमुख उपस्थितीला बळकट करते.वाहनाच्या पॉवरट्रेन पर्यायांमध्ये 1.0 लीटर टर्बो इंजिन, 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आणि एक ई-सीएनजी व्हेरिएंट समाविष्ट आहे, त्यापैकी प्रत्येक एक उल्लेखनीय ड्रायव्हिंग अनुभव देण्यासाठी डिझाइन केले गेले आहे.
1.0 लीटर टर्बो इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे, जे पॉवर आणि परफॉर्मन्सला प्राधान्य देतात त्यांच्यासाठी अष्टपैलुत्व ऑफर करते. 1.2 लीटर पेट्रोल इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि इंटेलिजेंट गियर शिफ्ट (आयजीएस) सह येतो, तर 1.2 लीटर ई-सीएनजी पर्याय अपवादात्मक इंधन कार्यक्षमता सुनिश्चित करतो.
ऑल-न्यू अर्बन क्रूझर टेसर 1.0 लीटर टर्बो पर्यायामध्ये 5500 rpm वर 100.06 पीएसची जास्तीत जास्त पॉवर देते, जे मॅन्युअलसाठी 21.5 किमी/लीटर आणि ऑटोमॅटिकसाठी 20.0 किमी/लीटर या विभागातील सर्वोत्तम इंधन कार्यक्षमतेसह पॉवर पॅक्ड ड्रायव्हिंग अनुभव देते. 1.2 लीटर पेट्रोल इंजिन 21.7 मॅन्युअल आणि 22.8*(एएमटी) किमी/लीटर च्या इंधन कार्यक्षमतेसह 6000 rpm वर जास्तीत जास्त 89.73 PS पॉवर देते. ऑल-न्यू अर्बन क्रूझर टेसर ई-सीएनजी पर्यायामध्ये देखील उपलब्ध आहे जे 28.5* किमी / किग्रा ची इंधन कार्यक्षमता देते.
टोयोटाच्या समृद्ध एसयूव्ही वारशातून प्रेरित, ऑल-न्यू टोयोटा अर्बन क्रूझर टेसरमध्ये एक अनोखे फ्रंट डिझाइन, क्रोम गार्निशसह प्रीमियम फ्रंट ग्रिल, स्लीक 16” मशीन्ड अलॉय व्हील आणि एस+ आणि जी व्हेरिएंट मध्ये डायनॅमिक ऑल ब्लॅक पेंटेड अलॉय व्हील्स समाविष्ट आहेत.1.0लीटर टर्बो, 1.2लीटर पेट्रोल आणि ई-सीएनजी पर्यायांमध्ये उपलब्ध आहे जे, पावरफुल परफॉर्मन्स आणि अतुलनीय इंधन कार्यक्षमता देते.
टोयोटा आयकनेक्ट सिस्टीम, हेड-अप डिस्प्ले, 360 व्ह्यू कॅमेरा आणि वायरलेस चार्जरसह सोयीस्कर प्रवास अनुभवासाठी प्रगत तंत्रज्ञान आणि स्मार्ट कनेक्टेड वैशिष्ट्ये यांचा समावेश आहे.ऑल-न्यू टोयोटा अर्बन क्रूझर टेसरमध्ये ड्युअल-टोन डॅशबोर्ड, प्रीमियम फॅब्रिक सीट्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि फ्लॅट-बॉटम लेदर-रॅप्ड स्टीयरिंग व्हीलसह प्रशस्त, प्रीमियम केबिन आहेत.
6 एअरबॅग्ज, हिल होल्ड असिस्टसह वाहन स्थिरता नियंत्रण, रोल-ओव्हर मिटिगेशन आणि ईबीडी सह एबीएस यासह सर्वसमावेशक सेफ्टी फीचर्स आहे.मानक 3-वर्ष/100,000 किमी वॉरंटी, जे 5 वर्षे/220,000 किमी पर्यंत वाढवले जाऊ शकते, विशेष प्रीपेड देखभालसाठी टोयोटा स्माईल प्लस पॅकेज देखील आहे.टोयोटा अर्बन क्रूझर टेसरची किमत 7,73,500 रुपयांपासून सुरू होते आणि बुकिंग 11,000 रुपयांपासून सुरू होते.