सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

वर्ल्ड ट्रामा डे: जोखीम आणि प्रतिबंधात्मक उपाय डॉ. रोमिल राठी, एमबीबीएस, एमएस ऑर्थोपेडिक्स, वोक्हार्ट हॉस्पिटल

वर्ल्ड ट्रामा डे: जोखीम आणि प्रतिबंधात्मक उपाय
डॉ. रोमिल राठी, एमबीबीएस, एमएस ऑर्थोपेडिक्स, वोक्हार्ट हॉस्पिटल

वर्ल्ड ट्रामा दिनानिमित्त डॉ.रोमिल राठी यांनी ट्रॉमाशी संबंधित धोकादायक दुखापतींबद्दल माहिती देताना सांगितले, बाईकर्स, विशेषत: मोटारसायकल किंवा सायकल वापरणाऱ्या तरुणांना बाईक चालवण्याचा अनुभव नसणे, धोकादायक आणि चीडखोर वागणूक आणि योग्य संरक्षणात्मक गियर न वापरणे यासारख्या कारणांमुळे ट्रामा-संबंधित दुखापत होण्याचा धोका जास्त असतो. जेव्हा या व्यक्ती ट्रॉमा सेंटरमध्ये येतात तेव्हा त्यांच्या सर्वात सामान्य दुखापतींमध्ये खालील जखमांचा समावेश असतो:

1. डोक्याला दुखापत होणे: हेल्मेट न वापरल्यामुळे मेंदूला गंभीर दुखापत (टीबीआय), मस्तिष्काघात किंवा कवटीचे फ्रॅक्चर होऊ शकते.

2. फ्रॅक्चर होणे: जेव्हा बाईकस्वार त्यांच्या बाइकवरून पडतात किंवा त्यांची एखाद्या बाईकला टक्कर होते तेव्हा हात, पाय किंवा कॉलरबोन्सची हाडे फ्रॅक्चर होणे सामान्य बाब आहे.

3. पाठीच्या कण्याला दुखापत होणे : गंभीर अपघातांमुळे पाठीच्या कण्याला इजा पोहोचू शकते, ज्यामुळे पक्षाघात किंवा दीर्घकालीन अपंगत्व येऊ शकते.

4. अंतर्गत जखम: बाइकवरून पडल्यामुळे किंवा टक्कर झाल्यामुळे आतील अवयवांचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव होऊ शकते किंवा फुफ्फुस पंक्चर होऊ शकतात.

5. रोड रॅश: फुटपाथवर किंवा रस्त्यावर घसरल्यामुळे त्वचेवर रॅशेस येतात, जे सौम्य किंवा गंभीर असू शकतात, ज्यासाठी अनेकदा स्किन ग्राफ्ट्सची आवश्यकता असते.
या दुखापतींची तीव्रता अनेकदा अपघाताचा वेग, बाईकस्वाराने संरक्षणात्मक गियर घातले होते की नाही आणि अपघात ज्या वातावरणात झाला होता त्यावर अवलंबून असते. ट्रॉमा सेंटर्स सामान्यत: रुग्णाला त्याच्या सामान्य स्थितीत आणणे, पुढे येणाऱ्या दुखापती टाळणे आणि आवश्यक सर्जिकल किंवा नॉन-सर्जिकल उपचार सुरू करण्यावर लक्ष केंद्रित करतात.
हेल्मेट, रिफ्लेक्टिव कपड़े आणि संरक्षणात्मक गियर घालणे तसेच वाहतूक नियमांचे पालन करणे यासारखे प्रतिबंधात्मक उपाय गंभीर दुखापत होण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी करू शकतात.

- Advertisment -