सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

हिवाळ्यात शरीर उबदार ठेवणाऱ्या पदार्थांचा करा आहारात समावेश

हिवाळ्यात शरीर उबदार ठेवणाऱ्या पदार्थांचा करा आहारात समावेश

स्वाती अवस्थी, मुख्य आहारतज्ञ, वोक्हार्ट हॉस्पिटल्स

नागपूर: हिवाळा म्हटले, की ओठ फाटणे, त्वचेवर कोरडेपणा, पायातील टाचेला पडलेल्या भेगा, असे चित्र समोर येते. या दिवसांत सकाळी रजाई, दुलई सारखे उबदार अंथरूण सोडण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे हिवाळ्यात घरी आराम करत असतानाही अनेकदा फ्लू किंवा सर्दी सारख्या लक्षणांचा सामना करावा लागतो. तसे पाहिले तर हिवाळा हा गरम अन्न पदार्थ, हेल्दी फूड आणि गरम कपड्यांचा काळ आहे.

या हंगामात मानवी शरीराची चयापचय आणि उर्जा पातळी बदलते. आहार बदलतो आणि हिवाळ्यात उबदार वाटण्यासाठी अधिक खाण्याची इच्छा निर्माण होते. या थंड महिन्यांत शरीराला आजाराचा सामना करण्यासाठी अतिरिक्त संरक्षणाची आवश्यकता असते. त्यामुळे हिवाळ्यात आतून उबदार ठेवणाऱ्या आहाराची शरीराला गरज असते.

आपल्या शरीराला आवश्यक पोषक घटकांकडे लक्ष देण्यासाठी हिवाळा हा अत्यंत योग्य ऋतू आहे. या दिवसांत आपल्याला मजबूत रोगप्रतिकारक प्रणाली विकसित करता येते. जी आपल्याला पुढील ऋतूंचा सामना करण्यासाठी मदत करते. हिवाळ्यात वातावरणात गारवा असल्याने या दिवसांत खोकला आणि सर्दी सहज होत असते. आणि आपण या हंगामात फळांचे आणि भाज्यांचे भरपूर सेवन करू शकतो. हिवाळ्यात काही असे सुपरफूड्स आहेत जे केवळ आरोग्यदायीच नाहीत, तर चवदार आणि शरीर आतून उबदार ठेवण्यासोबतच शरीराला आवश्यक पोषण घटक पुरविण्यास मदत करतात.

१. बाजरा – गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्राच्या आहाराचा महत्त्वाचा घटक असलेले बाजरा हे गहू किंवा तांदळापेक्षा कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले धान्य आहे. यामध्ये मॅग्नेशियम, हृदयासाठी उत्तम कोलेस्ट्रॉल नियंत्रित करणारा आणि शरीराला उपयुक्त असलेले धान्य आहे. बाजरा ग्लूटेन फ्री असतो. यात लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक आणि तांबे सारखी खनिजे पदार्थ असतात. बाजरा खिचडी, कढी आणि बाजरा रोटले हिवाळ्यातील आवडते पदार्थ आहेत.

२. रताळी– चवदार असलेल्या रताळ्यांमध्ये इतर प्रकारच्या कंदमुळापेक्षा दुप्पट फायबर्स असतात. यामध्ये व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी६ ची महत्त्वाची पोषणतत्त्वे असतात. ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवून मळमळ कमी करण्यास मदत करतात. हिवाळ्यात शरीर उबदार राहण्यासाठी रताळे भाजून, बेक करून किंवा इतर कोणत्याही प्रकारे खाल्ले जाऊ शकतात.

३. खजूर –बालपणी तुम्ही भरपूर खजूर खाल्ले असतील. नसतील तर तुम्ही एक फायदेशीर अनुभव गमावला असू शकतो. खजुराच्या नियमित सेवनाने शरीर उबदार राहते. खजुरात लोह, प्रोटिन, कॅल्शियम आणि अनेक इतर जीवनसत्त्वांचे भरपूर प्रमाण असते. जे चांगल्या आरोग्यासोबतच शरिराला रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात.

४. लिंबूवर्गीग फळे – लिबूवर्गीय फळे शरीराल पोषक प्रमाणात व्हिटॅमिन सी चा पुरवठा करतात. जे आपली रोगप्रतिकारक प्रणाली बळकट करतात. या फळांमध्ये फायबर्स देखील मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे पचनक्रिया वाढून आरोग्य सुधारते सोबतच वजन कमी करण्यास मदत होते.

५. सुका मेवा – बदाम आणि अक्रोड हिवाळ्यातील सर्वोत्तम खाद्य पदार्थ आहेत. जे तुमच्या स्नायूंच्या प्रणालीला आणि हृदयाच्या आरोग्याला मदत करतात. यामध्ये व्हिटॅमिन ई आणि ओमेगा फॅट्स असतात. जी इन्सुलिन संवेदनशीलता वाढवतात.

६. डाळिंब– हे लाल फळ अँटीऑक्सिडन्ट्स आणि पोषणतत्त्वांनी भरलेले आहे. जे शरीरासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. डाळींब हे व्हिटॅमिन के आणि फायबर्सचे उत्तम स्रोत असतात. यातील व्हिटॅमीन सी चे प्रमाण 48% इतके असते. डाळींबातील अँटीऑक्सिडन्ट्स कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

७. ब्रोकोली आणि फुलकोबी – क्रूसिफेरस भाज्या हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्तीसाठी महत्त्वाच्या आहेत, कारण त्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होते. हिवाळ्यात गोभी पराठे, सूप उत्तम आहार ठरू शकतो.

पारंपरिक काढा– लहाणपणी आजीच्या हातून बनविलेला हळद, आलं, तुळशी आणि मध युक्त अँटी-इन्फ्लेमेटरी घटकांनी बनवलेला गरमागरम काढा तुम्हाला आठवत असेल. शरीराची उर्जा वाढवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. हिवाळ्यात तुळशी चहा आणि गरम सूप आणि काढे हे उत्कृष्ट ड्रिंक असतात. डिंक, तिळ आणि गुळ हे हिवाळ्यात शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ आहेत. डिंकाचे लाडू, तिळाचे चिक्की हिवाळ्यात लोकप्रिय खाद्य पदार्थ आहेत.

आरोग्य राखण्यासाठी संपूर्ण आहाराचा दृष्टिकोन आवश्यक असतो. ज्यात चांगला आहार आणि व्यायाम समाविष्ट असावा. हिवाळ्यातील खाद्य पदार्थांना रोजच्या आहारात समाविष्ट करणे उत्तम असते. यामुळे एकंदर चांगले पोषण सुनिश्चित होईल. हिवाळ्यात आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आणि हिवाळ्यात गरम आणि सुरक्षित राहण्यासाठी योग्य आहार घ्या.

- Advertisment -