सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपालांचे चहापान

प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपालांचे चहापान

मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती

मुंबई : देशाच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी रविवारी संध्याकाळी राजभवनाच्या हिरवळीवर निमंत्रितासाठी स्वागत समारंभ व चहापानाचे आयोजन केले होते. राष्ट्रगीत व राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर राज्यपाल व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

कार्यक्रमाला राज्यपालांच्या पत्नी सुमती राधाकृष्णन, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्ये, उद्योजक अशोक हिंदुजा, प्रकाश हिंदुजा, निरंजन हिरानंदानी, आमदार अमीन पटेल, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ रवींद्र कुलकर्णी, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ उज्वला चक्रदेव, एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ हेमलता बागला, अभिनेते जॅकी श्रॉफ, पार्श्वगायक उदित नारायण, वर्षा उसगावकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत, मुंबईचे मावळते आर्चबिशप ऑस्वाल्ड ग्रेशिअस व नवे आर्चबिशप जॉन रॉड्रिग्स आणि विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -