सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

अनुसूचित जाती जमाती आयोगाने घेतली भांडेवाडी डम्पिंग यार्ड मधील आगीची गंभीर दखल

अनुसूचित जाती जमाती आयोगाने घेतली भांडेवाडी डम्पिंग यार्ड मधील आगीची गंभीर दखल

नागपूर. नागपूर शहरातील भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये आज शनिवारी (19 एप्रिल) लागलेल्या आगीबद्दल महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी या आगी संदर्भात स्थानिक नागरिकांकडून प्राप्त तक्रारीनुसार बेजाबदार अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे.

भांडेवाडी डम्पिंग यार्ड सभोवतालच्या परिसरात अनुसूचित जाती, जमातीचे गरीब नागरिक मोठ्या प्रमाणात वस्त्या करून राहतात. कचरा डम्पिंग यार्डच्या परिसरात मध्ये-मध्ये लागणारी आग, कचऱ्यातील मिथेन वायू, धूळ, धुलीकण आणि विषोक्त वायू यामुळे येथील नागरिकांचे जीवनमान अत्यंत गंभीर झाले आहे.

त्यांना श्वसनाचे, फुफ्फुसाचे आजार, पिण्याच्या पाण्यामध्ये आलेला दूषितपणा या सर्वांची तक्रार स्थानिक नागरिकांनी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्याकडे केली.

आयोगाने या तक्रारीची गंभीर दखल घेतली. भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये लागलेली आग नियंत्रणात आणताना प्रशासनाची मोठी दमछाक उडाली.

नागपूर महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी यांनी दुपारी 4.30 वाजता पर्यंतही घटनास्थळी पोहोचून कोणतेही निरीक्षण केले नाही व या सर्व गंभीर बाबीची दखल घेतली नाही.

या सर्व प्रकारची गांभीर्याने दखल घेत लवकरच या सर्व बाबींचा अहवाल मनपा प्रशासनाकडून मागवू. यात योग्य ती प्रक्रिया पार पाडत जबाबदार अधिकाऱ्यांवर गंभीर स्वरूपाची कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिला आहे.

- Advertisment -