सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

वैशाख बुध्द पौर्णिमा निमित्त ड्रॅगन पॅलेस ची पूर्व तयारी पूर्ण

वैशाख बुध्द पौर्णिमा निमित्त ड्रॅगन पॅलेस ची पूर्व तयारी पूर्ण

विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे विशेष बुध्द वंदना व धम्मदेसना कार्यक्रमाचे आयोजन

बुध्द जयंती निमित्त ड्रॅगन पॅलेस ला आकर्षक रोशनाईची सजावट

वैशाख बुध्द पौणिमा च्या निमित्ताने कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख व माजी राज्यमंत्री मा. ॲड. सुलेखाताई कुंभारे यांच्या मार्गदर्शनात विशेष बुध्द वंदना व धम्मदेसना चे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवार दिनांक १२ मे २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे पुजनिय भिक्खु संघाद्वारे विशेष बुध्द वंदना घेवून उपस्थित उपासक-उपासिकांना धम्मदेसना देण्यात येणार आहे.

वैशाख पौर्णिमच्या निमित्ताने ड्रॅगन पॅलेस टेम्पल स्वच्छ धुवून काढण्यात आला आहे ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या मध्यभागी असलेल्या ८६४ किलो वजनी अखंड चंदनाच्या तथागतांच्या मुर्ती समोर सुंदर रंगबिरंगी फुलांनी सजविण्यात येणार आहे. ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथील बगीच्या मध्ये विविध रंगाच्या फुलवि झाडे लावण्यात येत आहेत. व ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा संपूर्ण परीसर पंचशीलव्या झेंडयानी न्हाऊन गेला आहे. तसेच ड्रॅगन पॅलेस टेम्पलला आकर्षक विद्युत रोशनाईने सुध्दा सजविण्यात आले आहे.

ड्रॅगन पॅलेस विपस्सना मेडीटेशन सेंटर येथे एक दिवसीय ध्यान शिबीराचे आयोजन

सोमवार दिनांक १२ मे २०२५ रोजी वैशाख बुध्द पौर्णिमाचे औचित्य साधुन ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात असलेल्या ड्रॅगन पॅलेस विपस्सना मेडीटेशन सेंटर येथे दिनांक १२ मे २०२५ रोजी एक दिवसीय ध्यान शिबीराचे आयोजन सुध्दा करण्यात आलेले आहे. हे शिबीर सकाळी ०९.०० ते सायंकाळी ०५,०० वाजता पर्यत होणार आहे. या ध्यान शिबीरामध्ये ज्या साधकांनी १० दिवसीय ध्यान शिबीर केले असतील त्यांना थेट सहभागी होता येईल. अशी माहीती ड्रॅगन पॅलेस विपस्सना मेडीटेशन सेंटरच्या व्यवस्थापिका रेखा भावे यांनी दिली.

 

 

- Advertisment -