सुप्रिम कोर्टाचे मुख्य सरन्यायाधीश भुषण गवई अत्यंत प्रामाणिक, एकनिष्ठ व निष्पक्ष व्यक्तिमत्वाचे धनी- ॲड. सुलेखाताई कुंभारे
कामठी : अमरावती महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले तथा सुप्रिम कोर्टाचे मुख्य सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतलेले मा.भुषण रामक्रृष्ण गवई हे उत्कृष्ट अभ्यासु व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यात सद्सदविवेकबुद्धी, प्रामाणिकपणा, मनमिळाऊपणा, समाजासाठी एकनिष्ठ व निष्पक्ष, रोकठोक भुमिका घेणारे म्हणुन संपुर्ण विधी व न्याय वर्तुळात मा. भुषण गवई यांची ओळख असुन सुप्रिम कोर्टाच्या मुख्य सरन्यायाधीश पदी त्यांना आज महामहिम राष्ट्रपती यांनी शपथ दिल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करते अशा शब्दांत माजी राज्यमंत्री अँड.सुलेखाताई कुंभारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मा. मुख्य सरन्यायाधीश यांच्या उज्जवल भविष्यासाठी मंगलमय शुभेच्छा ही अँड. सुलेखाताई कुंभारे यांनी याप्रसंगी दिल्या. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायामूर्ति श्री. भुषण गवई यांनी बुधवारी भारताचे ५२ वे सर न्यायाधीश म्हणून शपथ घेतली त्याबद्दल मा. ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
उल्लेखनीय आहे की, या पुर्वी न्यायमूर्ति मा. भुषण गवई यांनी विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस ला भेट दिली होती, तसेच कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित होते.