सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

जिल्ह्याचे नवनियुक्त अध्यक्ष आनंदराव राऊत आणि मनोहर कुंभारे यांनी पदभार स्वीकारला

जिल्ह्याचे नवनियुक्त अध्यक्ष आनंदराव राऊत आणि मनोहर कुंभारे यांनी पदभार स्वीकारला

१६ मे रोजी कामठी येथे तिरंगा यात्रा

यात्रेत नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन

 नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या नागपूर जिल्ह्याचे नवनियुक्त अध्यक्ष आनंदराव राऊत (रामटेक जिल्हा ) आणि मनोहरराव कुंभारे (काटोल जिल्हा) यांनी अध्यक्ष म्हणून बुधवारी पदभार स्वीकारला. यावेळी मावळते जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी दोन्ही नवनियुक्त अध्यक्षांचे शाल श्रीफळ देत स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

कोराडी येथील जनसंपर्क कार्यालयात हा पदग्रहण सोहळा पार पडला. या पदग्रहण सोहळ्याला भाजपचे ज्येष्ठ नेते आनंदराव ठवरे, डॉ. राजीवजी पोद्दार, माजी जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, माजी आमदार टेकचंद सावरकर, माजी आमदार सुधीर पारवे, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्ह्याचे महामंत्री अनिल निधान, आदर्श पटले, रिंकेश चवरे, संध्याताई गोतमारे, दिनेश ठाकरे, उदयसिंग यादव आदी जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यानी नवनियुक्त दोन्ही अध्यक्षांचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी मावळते जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्या कार्यकाळातील कामाचा आढावा घेण्यात आला. दोन्ही नवीन अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आता आपल्यला काम करायचे आहे. जिल्ह्यातील संघटन अधिक मजबूत करत आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपची सत्ता आणायची आहे असे आवाहन यावेळी सुधाकर कोहळे यांनी केले. यावेळी मनोहर कुंभारे आणि आनंदराव राऊत यंची भाषणे झाली.

भारतीय जनता पक्ष जिल्ह्याच्या वतीने १६ मे रोजी सकाळी ८ वाजता सिंदूर सन्मान तिरंगा यात्रा कामठी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जयस्तंभ चौक येथून निघणार आहे. आणि नगरपरिषद मैदान कामठी येथे समारोप होणार आहे. या तिरंगा यात्रेला राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर ब अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहे.

यावेळी तिरंगा यात्रेच्या निमित्ताने बैठकीत तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी तिरंगा यात्रेची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाला डॉ.शिरीष मेश्राम, अजय अग्रवाल, नरेश मोटघरे, आशिष फुटाणे, अजय बोढारे, राजेश रंगारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अनिल निधान यांनी तर आभार उदयसिंग यादव यांनी मानले.

- Advertisment -