लघुवेतन कॉलनी मातोश्री रमाई उद्यान गेट जवळ भोजनदान
नागपूर : तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती चे औचित्य साधून लघुवेतन कॉलनी मातोश्री रमाई उद्यान गेट जवळ बुधवार (१४ मे) रोजी भव्य भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो उपासक-उपासिकांनी या मंगल सोहळ्याचा लाभ घेतला. उपस्थित श्रोत्यांचे मनोरंजन व्हावे म्हणून कराओ के फिल्मी गितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
ॲड. बाळासाहेब दुपारे, लघुवेतन कॉलनी चे सचिव प्रभाकर मात्रे यांनी एकापेक्षा एक फिल्मी गितांची प्रस्तुती करूण उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. लहान मुलांसाठी बुद्धी मतेचा खेळ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शालीनीताई टेंभूर्णे, किरणताई पाटील, प्रा. रोशनी लोणारे, वैशालीताई गोडबोले, सुचित्रा दुपारे, स्मिता सोरदे, बाळासाहेब पाटील, विजय कराडे, विकास गोडबोले, अभिषेक कोकोड्डे, प्रवीण पाटील, लक्ष्मण सोरदे, अजय पेंदाम, स्वप्नील भालेराव, नंदु वाळके आदींनी परिश्रम घेतले.