बसपा ने मातोश्री रमाई व सविता आंबेडकर यांचा संयुक्त स्मृतिदिन केला
नागपूर : बहुजन समाज पार्टीच्या वतीने उत्तर नागपूरच्या यादव नगरातील बहुजन हिताय बुद्ध विहार परिसरात असलेल्या रमाईंच्या भव्य पुतळ्याला तसेच सविता आंबेडकरांच्या फोटोला बसपा नेते उत्तम शेवडे माझी नगरसेविका वैशाली अविनाश नारनवरे ह्यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. आज मातोश्री रमाई आंबेडकर यांचा 90 वा व सविता आंबेडकर यांचा 22 वा स्मृती दिवस असल्याने कही हम भूल न जाये या राष्ट्रीय अभियानांतर्गत आज संयुक्तरीत्या साजरा करण्यात आला.
मातोश्री रमाई आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांसोबत 1998 पासून 1935 पर्यंत सलग 37 वर्षे घालविली. यादरम्यान बाबासाहेबांचे शिक्षण, उच्च शिक्षण, महाडचे आंदोलन, गोलमेज परिषदा आदि कार्यात रमाईं चे योगदान आहे. रमाईंच्या निधनानंतर बाबासाहेबांना अनेक व्याद्यांनी ग्रस्त केले, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सेवा सुश्रुषा करिता त्यांनी 1948 ला वयाच्या 57 व्या वर्षी डॉ सविता कबीर सोबत कायदेशीर विवाह केला. दरम्यान बाबासाहेबांना संविधान लिहिण्यास व बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासंदर्भात सविताची फिजिकली मदत झाली. त्यामुळे बहुजन समाजासाठी या दोन्ही मातोश्री असल्याचे मत बसपाचे महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी प्रामुख्याने मनपातील माजी पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार, गौतम पाटील, मोहम्मद इब्राहिम, जिल्हा महासचिव चंद्रशेखर कांबळे, सचिव अभिलेश वाहाने, माजी जिल्हा प्रभारी विलास सोमकुवर, माजी शहर प्रभारी राजेश चांदेकर, उत्तर नागपूर विधानसभा अध्यक्ष राजेश नंदेश्वर, माजी विधानसभा अध्यक्ष जगदीश गजभिये, ज्येष्ठ कार्यकर्ते बुद्धम राऊत, सिद्धार्थ पोफरे, नरेश मेश्राम, बलवंत राऊत, संघर्ष वानखेडे, पवन खोब्रागडे, राकेश नांदगावकर, तसेच बहुजन हिताय बुद्ध विहार कमिटीचे उत्तम चहांदे आदि प्रामुख्याने उपस्थित होते.