सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

भीमजयंती : आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या जीवनावरील चित्रपट : उमेश म्हैसकर चित्रपट निर्माते

भीमजयंती : आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या जीवनावरील चित्रपट : उमेश म्हैसकर चित्रपट निर्माते

नागपूर : आंबेडकरी कार्यकर्त्यांचा जीवन संघर्ष कसा असतो. एका बिघडलेल्या तरुणाला समाजात मानसन्मानाचे जीवन जगण्यासाठी उभे करण्याची महिलेची धडपड, असंघटित समाजाला संघटित करून बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभे करून भीम जयंती साजरी करणारा आजचा तरुण, निळ्या झेंड्याची संघटना व त्यांचे संघटितरित्या राजकारण दाखवणे हा या चित्रपटाचा मुख्य उद्देश असल्याचे या चित्रपटाचे लेखक व निर्माता उमेश म्हैसकर यांनी सांगून आंबेडकरी समाजाने हा चित्रपट बघावा असे आवाहन केले.

आज अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मदिनी बहुजन समाज पार्टीने भीम जयंती या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी स्थानिक टिळक पत्रकार भवन येथे या चित्रपटाचे निर्माते यांच्या पत्रपरिषदेचे आयोजन केले होते. त्यात निर्मात्याने आपली भूमिका व्यक्त केली.

परिषदेचे सूत्रसंचालन बसपाचे महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश बसपाचे महासचिव पृथ्वीराज शेंडे, नागोराव जयकर, विद्यार्थी नेते प्रा नितेश कांबळे, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, राजकुमार बोरकर महासचिव चंद्रशेखर कांबळे, सचिव अभिलेश वाहाने, उमेश मेश्राम, अंकित थूल, नितीन वंजारी, विलास पाटील, अभय डोंगरे, संभाजी लोखंडे, जगदीश गेडाम, शामराव तिरपुडे यांचे सहित मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पंचशील थिएटर मध्ये जाऊन भीम जयंती हा चित्रपट बघितला.

- Advertisment -