ग्लोबललॉजिकने नागपूरमध्ये स्टेम इनोव्हेशन लॅबचे केले उद्घाटन
प्रादेशिक कौशल्यवृद्धीसाठी महत्त्वाचे पाऊल
प्रत्यक्ष स्टेम शिक्षणाच्या माध्यमातून 400 हून अधिक विद्यार्थ्यांना भविष्यकालीन कौशल्यांनी सुसज्ज केले जाईल
नागपूर : डिजिटलक प्रॉडक्ट इंजिनिअरिंग क्षेत्रातील आघाडीची कंपनी आणि हिताची समूहाचा भाग असलेल्या ग्लोबललॉजिकने आज नागपूरमधील सी. पी. बेरार हायस्कूल येथे अत्याधुनिक ‘रोबो शिक्षा केंद्र’ या स्टेम इनोव्हेशन लॅबचे उद्घाटन केले. इंडिया स्टेम फाउंडेशनच्या सहकार्याने राबवण्यात आलेली ही योजना, ग्लोबललॉजिकच्या #EducateToEmpower या प्रमुख सीएसआर उपक्रमाचा भाग आहे.
या उपक्रमाचा उद्देश वंचित समुदायातील विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (स्टेम) या विषयांमध्ये समान आणि प्रत्यक्ष शिक्षण संधी उपलब्ध करून देत त्यांना सक्षम बनवणे आहे.
या उपक्रमाचा उद्देश शालेय विद्यार्थ्यांना भविष्यात उपयुक्त ठरणारी महत्त्वाची कौशल्ये प्रदान करणे असा आहे. नव्याने सुरू करण्यात आलेली ही स्टेम इनोव्हेशन लॅब विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कोडिंग यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानात सखोल, अनुभवाधारित शिक्षण देण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
तसेच, शिक्षकांच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी सुसंघटित प्रशिक्षण कार्यक्रमदेखील यामध्ये समाविष्ट आहेत. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात 6वी ते 11वी इयत्तेतील 400 हून अधिक विद्यार्थ्यांना लाभ मिळणार असून, पुढील टप्प्यांमध्ये दरवर्षी सुमारे 500 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची योजना आहे.
नागपूर हे ग्लोबललॉजिकसाठी धोरणात्मक दृष्टिकोनातून महत्त्वाचे केंद्र आहे. येथील वाढते कौशल्ययुक्त मनुष्यबळ, मजबूत शैक्षणिक पायाभूत सुविधा आणि भारताच्या व्यापक तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढते महत्त्व यामुळे हा परिसर ग्लोबललॉजिकच्या दीर्घकालीन समुदाय सहभाग आणि कार्यबल विकासाच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे. हा उपक्रम ग्लोबललॉजिकच्या उच्च क्षमतेच्या प्रादेशिक केंद्रांमध्ये समावेशक वाढ घडवून आणण्याच्या वचनबद्धतेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
समुदाय पोहोच उपक्रमांव्यतिरिक्त, ग्लोबललॉजिक नागपूरमध्ये आपला व्यवसाय विस्तारण्याच्या संधी शोधत असून, येत्या दोन वर्षांत 400 हून अधिक कर्मचाऱ्यांची भरती करण्याची शक्यता आहे. ग्लोबललॉजिकने भारतभरात आतापर्यंत 6 स्टेम लॅब्स स्थापन केल्या असून, याचा 4,400 हून अधिक विद्यार्थ्यांवर सकारात्मक परिणाम झाला आहे.
या उपक्रमांद्वारे ट्वेंटी-फर्स्ट सेंच्युरी स्किल्स जसे की क्रिटिकल विचार, नवोपक्रम, सर्जनशीलता, सहकार्य आणि समस्या सोडवण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित केली जात आहे. आघाडीच्या अंमलबजावणी संस्थांबरोबर भागीदारी करून, ग्लोबललॉजिक भारतभर आपल्या सामाजिक प्रभावाचा विस्तार करत आहे.
या स्टेम लॅबच्या उद्घाटन सोहळ्यास श्री.मनोजकुमार पांडा (क्युरेटर – डी, रमन सायन्स सेंटर, प्लॅनेटरियम, नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियम्स- एनसीएसएम), तसेच ग्लोबललॉजिकचे वरिष्ठ अधिकारी श्री.अमित काळे (असोसिएट व्हाइस प्रेसिडेंट – इंजिनिअरिंग), कु. मोनिका वालिया (सीएसआर प्रमुख, एपीएसी) आणि इंडिया स्टेम फाउंडेशनचे संस्थापक संचालक श्री. सुधांशु शर्मा उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना ग्लोबललॉजिकचे असोसिएट व्हाइस प्रेसिडेंट – इंजिनिअरिंग श्री. अमित काळे म्हणाले, “नागपूरमधील ही स्टेम लॅब आमच्या या विश्वासाचे प्रतीक आहे की खरी परिवर्तनाची सुरुवात ‘प्रवेशापासून’ होते. गुणवत्तापूर्ण शिक्षण, तंत्रज्ञान आणि अनुभवाधिष्ठित शिक्षणाच्या संधींपर्यंतचा संधींपर्यंत सहज पोहोच मिळाल्यानेच खरा बदल घडतो.
या भागातील तरुणांमध्ये आम्हाला अपार क्षमता दिसते आणि या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, कौतुकाची भावना आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहोत, कारण हेच विद्यार्थी आपल्या डिजिटल भविष्यातील शिल्पकार ठरणार आहेत.”
ग्लोबललॉजिकच्या सीएसआर प्रमुख (एपीएसी) मोनिका वालिया म्हणाल्या, “ही स्टेम इनोव्हेशन लॅब केवळ एक जागा नाही, तर ही सर्जनशीलता, नवोपक्रम आणि समान शैक्षणिक संधींचे प्रवेशद्वार आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या चार विषयांच्या समन्वयातून, आम्ही अशा समुदायांतील दडलेल्या प्रतिभेला चालना देत आहोत, जिथे संधी कमी असते.
हा उपक्रम आमच्या सामाजिक प्रभावाच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाचे प्रतीक आहे आणि विविध कल्पनांनी आणि असीम शक्यतांनी भरलेले भविष्य घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.”
श्री. सुधांशु शर्मा – संस्थापक व संचालक, इंडिया स्टेम फाउंडेशन यांनी सांगितले,“ग्लोबललॉजिकसोबतची ही भागीदारी भारतात स्टेम शिक्षण सर्वांसाठी सहज उपलब्ध, आकर्षक आणि परिणामकारक बनवण्याच्या आमच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
सीएसआर उपक्रमाद्वारे भविष्यकालीन कौशल्यांनी सज्ज मनुष्यबळ घडवण्याबाबत त्यांची वचनबद्धता केवळ ‘रोबो शिक्षण केंद्र’ उपक्रमाला बळकट करते असे नाही, तर तर पुढच्या पिढीतील नवोपक्रमशील विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्याच्या आमच्या सामायिक दृष्टीकोनालाही आधार देते.
ग्लोबललॉजिकच्या सहकार्यामुळे, आम्ही आमचे प्रयत्न अधिक व्यापक स्तरावर राबवू शकतो आणि भविष्यातील तंत्रज्ञान व समाज घडवणाऱ्या तरुण बुद्धीमत्तेला योग्य प्रकारे घडवू शकतो.”
या स्टेम लॅबच्या सुरूवातीमुळे भारताच्या ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी 2020)’ च्या दृष्टीकोनाशीही सुसंगती निर्माण होते, जे शालेय अभ्यासक्रमात स्टेम विषयांचा समावेश करण्यास प्रोत्साहन देते, प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षणाला चालना देते आणि चिंतनशील विचार व समस्या सोडवण्याच्या क्षमतेच्या विकासास पाठिंबा देते.
शिक्षण क्षेत्रातील ग्लोबललॉजिकचा सातत्यपूर्ण सहभाग हा भारतातील प्रत्येक भागात भविष्यकालीन पिढी घडवण्याच्या त्यांच्या दृष्टीकोनाचे स्पष्ट प्रतिबिंब आहे – ज्याची सुरुवात शालेय स्तरापासून होते.