सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

बारडोई सिपला आणि बिहू नृत्‍याने वाढवली रंगत 

बारडोई सिपला आणि बिहू नृत्‍याने वाढवली रंगत 

‘ऑक्टेव्ह 2025’ च्‍या दुसरा दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर : संपूर्ण भारतात ईशान्येकडील आठ राज्यांची संस्कृती ही अतिशय निराळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. या संस्कृतीतील वेशभूषा, लढाऊबाण्याचे लोकनृत्य आणि सण-उत्सवांदरम्यान सादर होणारे नृत्य या माध्यमातून ऑक्टेव्ह महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी पूर्वोत्तर लोकजीवनाचे संस्कृतिदर्शन घडविण्यात आले.

भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नॉर्थ इस्ट ऑक्टेव्ह 2025’ फेस्टिवले दक्षिण मध्‍य क्षेत्र परिसरात आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशीचा प्रारंभ अतिशय शांत आणि आल्हाददायक वातावरणात झाला. सर्वप्रथम लोकनृत्याची सुरुवात आसामच्या बारडोई सिपला, तसेच बिहू नृत्याने झाली. यातील महिला व पुरुष कलावंताचे आकर्षक पोशाख, पेहराव संस्कृती, रंगभूषा रसिकांना मोहवून गेली. यानंतर त्रिपुरातील मैनम्मा देवीची आराधना करणारे होजा गिरी आणि सिंगाई मोग नृत्य, मणिपूर राज्याचा पुंग ढोल चोलम, मेघालयचा वांगला डान्स, कशद मस्ती, मिझोरमचा चेरवू डान्स, नागालॅण्डचा नागा वॉर डान्स, अरुणाचल प्रदेशचा जूजू झाझा, सिक्कीमचा सिंगी चाम आदी नृत्यप्रकाराने आजचा दिवस गाजला.

दुसर्‍या सत्रात फॅशन शोच्या माध्यमातून आठही राज्यातील महिला व पुरुषांचे शस्त्र, पारंपरिक वस्त्रप्रावरणे, आभूषणे, पदन्यास आणि लकबी संगीताच्या तालावर अतिशय सुरेख पद्धतीने सादर करण्यात आल्या. कार्यक्रमाचे संचालन मोहिता दीक्षित आणि डॉ. विवेक अलोणी यांनी केले.

- Advertisment -