सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

गुणवत्तेसोबत कुठलीही तडजोड न करता पर्यावरण पूरक बांधकाम करा

गुणवत्तेसोबत कुठलीही तडजोड न करता पर्यावरण पूरक बांधकाम करा

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांचे आवाहन

फॉरेन्सिक सिव्हिल इंजीनियरिंग’ या विषयावर अखिल भारतीय चर्चासत्र

ना. श्री. गडकरी यांना इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सतर्फे ‘लाइफटाईम फेलोशीप’

नागपूर – बांधकाम क्षेत्रातील व्यावहारिक समस्या समजून घेण्याची गरज आहे. त्याचवेळी पर्यायी बांधकाम सामग्रीच्या सहाय्याने निर्माण खर्च कमी करण्यावर भर द्यायला हवा. गुणवत्तेशी कुठलीही तडजोड न करता बांधकाम क्षेत्रातील अभियंता तसेच हितधारक यांनी पर्यावरण पूरक आणि शाश्वत असे बांधकाम करावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शुक्रवार, दि. १० ऑक्टोबर) केले.

इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स नागपूर शाखेच्या वतीने ‘फॉरेन्सिक सिव्हिल इंजीनियरिंग’ या विषयावरील दोन दिवसीय अखिल भारतीय चर्चासत्राचे उद्घाटन ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स एमएसईचे अध्यक्ष ए. डब्ल्यू जवंजाळ तसेच इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअरचे राष्ट्रीय अध्यक्ष मनीष कोठारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

इमारत बांधकाम क्षेत्रातील नवतंत्रज्ञानाविषयी बोलताना ना. श्री. गडकरी यांनी सांगितले की, ‘सध्याच्या काळात ‘रोड फॅक्टरी’ची गरज असून ‘प्री-कास्ट’ मटेरियलच्या असेंबलींगच्या सहाय्याने आता रोड आणि इमारतींचे निर्माण आवश्यक आहे. यामुळे प्रत्येक जिल्ह्यात प्री कास्ट टेक्नॉलॉजीचा वापर झाल्यास ते उद्योगाला फायदेशीर ठरेल. उड्डाणपुलामध्ये स्टील फायबरच्या उपयोगामुळे दोन पीअर मधील अंतर कमी झाले आहे. त्यामुळे बांधकाम खर्चात देखील कपात झाली आहे.’

वणी-वरोरा-जाम येथे बांबूचे क्रॅश बॅरियर्स लावल्यामुळे सुद्धा खर्च वाचला आहे. बायो बिटुमीनच्या सहाय्याने मनसर येथे 1 किलोमीटर लांबीचा रस्ता देखील नुकताच बनवण्यात आला आहे. अशा प्रकारच्या शाश्वत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तसेच पर्यावरण पूरक आणि भविष्यातील दृष्टिकोन ठेवून बांधकाम केल्यास अपघाताच्या घटना कमी होईल, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले.

ना. श्री. गडकरी यांना ‘लाइफटाईम फेलोशीप’!

याप्रसंगी ना. श्री. गडकरी यांना इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सच्या वतीने फेलोशिप प्रदान करण्यात आली. कृतज्ञता, आदर आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून ही ‘लाइफटाइम फेलोशिप’ प्रदान करण्यात आली. इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सच्या १०५ वर्षांच्या इतिहासात, या फेलोशिपचा मान पटकाविणारे ना. श्री. गडकरी १२ वे दिग्गज आहेत.

- Advertisment -