इच्छुक उमेदवारांना “एकच साहेब बाबासाहेब” फाउंडेशन तर्फे हक्काचा उपदेश व संधी
नागपूर : एकच साहेब बाबासाहेब फाऊंडेशन प्रणित मंच द्वारा महानगरपालिका नागपूरच्या पंचवार्षिक निवडणूका लढवित आहोत. भारतीय संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकरा शिवाय आमच्या व बहुजन समाजा (SC, ST, OBC) चा दुसरे कोणीच साहेब ठरू शकत नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित कार्यकर्ताच, विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा येथे तसेच स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगर पंचायत, महानगरपालिका मध्ये असणे आवश्यक आहे. आजपर्यंतच्या अनुभवा नुसार वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये स्वतःला आंबेडकरवादी समजणारे अनेक महानुभव आहेत. परंतु नाव डॉ. बाबासाहेबांचे घेवून काम इतरांचे करणे हे योग्य नाही. डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या मार्गदर्शनाने काम करण्याचा आम्ही विडा उचललेला आहे. आम्हाला विषमतावाद संपवून समतावाद प्रस्थापित करायचा आहे. म्हणून डॉ. बाबासाहेबांचे विचार डोक्यात ठेवून सहृदय आम्हाला डॉ. बाबासाहेबांचा राजकीय, सामाजिक गाडा आहे. त्या ठिकाणी साबुत ठेवून तो पूढे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. या कार्यात आम्ही निश्चितच यशस्वी होवू असा आम्हांला विश्वास आहे. आजर्पतच्या अनुभवातून बऱ्याच घटना अनुभवल्या समाजाचे नुकसानच होते असे सर्वच बोलतात पण करत काहीच नाहीत, जे करतात ते स्वतःच्या हिताकरीता करतात. समाजहितासाठी केले पाहिजे असे आमचे मत आहे. डॉ. बाबासाहेब यांनी आजच्या पुढाऱ्याचे वर्तन केले असते तर ते, टाटा, बिरला, अदानी व अंबानीच्या पेक्षा जास्त धन संपत्ती कमवली असती. परंतु त्यांनी आपल्या पत्नी, मुलाबाळांकडे व कुटुंबाकडे दुर्लक्ष करून समाजाच्या हितासाठीच झटले. त्यांचा त्याग, त्यांचे कष्ट व त्यांचे परिश्रम यांचा समाजातील नव्हे तर संपूर्ण भारतीयांनी विचार करण्याची गरज आहे. कोणत्याही निवडणूका म्हटल्या कि, सामान्य जनतेला राजकारण वाटते आणि आज पक्षीय राजकारणाला गलीच्छ रूप प्राप्त झाले आहे. डॉ.बाबासाहेबांनी आम्हाला न्याय व हक्क दिले. त्यामध्ये मतदान करण्याचा हक्क दिला “One Man One Vote आणि त्या वोट चे मूल्य एक” हा हक्क आम्हाला निःपक्षपातीपणे आम्हाला बजावता यावा यासाठी आम्ही “एकच साहेब बाबासाहेब फाऊंडेशन प्रणित मंच ची स्थापना करीत आहोत” व महानगरपालिकेची निवडणूक लढवित आहोत, जी सर्वसामान्य आंबेडकरवादी जनता आहे त्यांना आवाहन करीत आहोत कि ज्यांना निवडणूक निःपक्षपातीपणे लढावयाची आहे त्यांनी एकच साहेब बाबासाहेब फाऊंडेशनचे कार्यालय ३८२, सम्यक नगर, नारी रोड, स्टेट बँक जवळ, टेका नाका, नागपूर मो.नं. 7391000358 येथे तातडीने संपर्क करावा.
प्रभाग ३८ ही प्रभागातील निवडणूक लढण्यास उत्सुक उमेदवारांनी संपर्क साधून आपली सिट निश्चित करावी, असे निवेदन करण्यात येत आहे. मुलाखत रविवार दि.२१ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते ५ या वेळेत मुलाखतीस येतांनी आवश्यक कागदपत्र सोबत आणावे. अशी विनंती अध्यक्ष उत्तमप्रकाश शहारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.


