सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

‘अॅडव्हांटेज विदर्भ 2026 – खासदार औद्योगिक महोत्सव’चे 6 फेब्रुवारीला उद्घाटन

‘अॅडव्हांटेज विदर्भ 2026 – खासदार औद्योगिक महोत्सव’चे 6 फेब्रुवारीला उद्घाटन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित 

महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

नागपूर : असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (AID) च्या वतीने आयोजित ‘अॅडव्हांटेज विदर्भ 2026 खासदार औद्योगिक महोत्सव’च्या तिसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन शुक्रवार, 6 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसर, अंबाझरी-अमरावती मार्ग, नागपूर येथे होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री व खासदार औद्योगिक महोत्सवाचे प्रणेते मा. श्री. नितीन गडकरी भूषवतील, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्राचे महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे, रोजगार मंत्री मा. श्री. आकाश फुंडकर, वित्त राज्यमंत्री मा. श्री. आशीष जयस्वाल, शिक्षण राज्यमंत्री मा. श्री. पंकज भोयर तसेच उद्योग व पर्यटन राज्यमंत्री मा. श्री. इंद्रनील नाईक देखील उपस्थित राहतील.

याशिवाय, झोहो कॉपरेशनचे मुख्य शास्त्रज्ञ श्री. श्रीधर वेम्बू, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बालसुब्रमण्यम प्रभाकरन, अदानी समूहाचे (एअरपोर्ट्स) संचालक श्री. जीत अदानी, तसेच महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी संचालक श्री. राजेश जेजुरीकर यांचा प्रामुख्याने समावेश आहे, याशिवाय, पर्नेड रिकार्ड इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक श्री. जीन टुबूल, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन (आयएएस) तसेच मुख्यमंत्री यांचे सल्लागार (गुंतवणूक, उद्योग व तंत्रज्ञान) श्री. कौस्तुभ धवसी यांचीही उपस्थिती राहणार आहे.

“एम्पॉवरिंग ग्रोथ” या संकल्पनेवर आधारित हा तीन दिवसीय भव्य औद्योगिक महोत्सव असून, यामध्ये विदर्भातील औद्योगिक सामर्थ्य, नवकल्पना आणि गुंतवणूक क्षमतेचे दर्शन घडवणारे भव्य औद्योगिक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. महोत्सवाच्या तयारी अंतिम टप्प्यात असून मुख्य सभागृह, प्रदर्शन हॉल्स व सत्र हॉल्स पूर्णतः सज्ज झाले आहेत. जागतिक दर्जाचा अनुभव देण्यासाठी जोरात तयारी सुरू असून अंतिम सजावटीचे काम सुरू आहे.

आंतरराष्ट्रीय व्यवसाय परिषद (इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्ह) यावेळच्या अॅडव्हांटेज विदर्भ 2026चे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. या परिषदेत 23 हून अधिक देशांचे राजदूत व व्यापार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. याशिवाय, संरक्षण, अन्नप्रक्रिया, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, शिक्षण, स्टार्टअप्स, पेटंट्स व नवकल्पना, लॉजिस्टिक्स, पर्यटन व आदरातिथ्य, सेबी संबंधित विषय, कोळसा, पोलाद तसेच औषधनिर्मिती अशा विविध क्षेत्रांवर तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.

सांस्कृतिक आणि मनोरंजन कार्यक्रम

या औद्योगिक महोत्सवात सांस्कृतिक व मनोरंजन कार्यक्रमांचीही रंगतदार मेजवानी असणार आहे. 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता नागपूरच्या प्रसिद्ध गायिका श्रीनिधी घटाटे यांचा लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे. 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता MKSSS स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी यांच्या वतीने फॅशन शोचे आयोजन करण्यात येणार असून, प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता ‘सितार सिम्फनी’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाणार आहे. याशिवाय गेमिंग झोन, नागपूर फूड फेस्टिव्हल, ई-व्ही एक्स्पो तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वापरण्यात आलेल्या ड्रोनद्वारे सादर होणारा भव्य ड्रोन शो ही विशेष आकर्षणे असणार आहेत.

विशेष आकर्षणे 

श्रीनिधी घटाटे यांचा लाईव्ह कॉन्सर्ट

‘सतार सिम्फनी’ सांस्कृतिक कार्यक्रम

फॅशन शो व ड्रोन शो

गेमिंग झोन, फूड फेस्टिव्हल व ई-व्ही एक्स्पो

 

कार्यक्रमाची तयारी

एकूण प्रदर्शन क्षेत्रफळ : 3,250 लाख चौ. फूट

सभागृहे: १ मुख्य सभागृह, ३ सत्र सभागृहे, २ प्रदर्शन सभागृहे

फूड झोन : 3

सर्व सभागृहे वातानुकूलित आहेत.

व्हीआयपी, प्रदर्शनकर्ते व पाहुण्यांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था

पत्रकार परिषदेला एआयडीचे अध्यक्ष आशीष काळे यांनी संबोधित केले. यावेळी सचिव डॉ. विजयकुमार शर्मा तसेच अन्य कार्यकारी सदस्य उपस्थित होते

- Advertisment -