सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

वाघोबा ने पर्यटकांना दोन तास थांबवले !

वाघोबा ने पर्यटकांना दोन तास थांबवले !

नागपूर : जंगल सफारी म्हटल तर पर्यटकांना वाघोबा बघायची हौस असते. वाघोबा दिसला की पर्यटक म्हणतो, जंगल सफारी सार्थक झाली. पण त्याच वाघोबाने पर्यटकांना दोन तास थांबवल असेल तर पर्यटकांची अवस्था काय झाली असेल, ते विचारापली कडे आहे. अशीच काही घटना पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या खुर्सापार जंगलात घडली.

नागपूर झिरो माईल पासून अवघ्या ८५ किमी अंतरावर कामठी रोड जबलपूर मार्गावर खवासा जवळ खुर्सापार पर्यटन स्थळ आहे. ६५ वर्ग किलोमीटर असा जंगलाचा व्याप आहे. सध्या या जंगलात पर्यटकांना वाघोबाचे दर्शन हमखास होत आहे. मागील आठवड्यात जंगलाचा राजा वाघोबाने पर्यटकांना चक्क दोन तास हलूच दिले नाही. गवताच्या गादीवर वाघोबा विश्रांती करीत असल्याची माहिती ‘गाईड’ ला मिळाली. मग काय २५ ते ३० जिप्सी वाघोबा बघायला ‘सुसाट’ निघाल्या. जिप्सी जिथे थांबल्या वाघोबा त्यापासून २० फुटाच्या अंतरावर गवताच्या गादीवर विश्रांती करीत होता.

वाघोबा उठेल व आम्ही त्याला भ्रमण करताना बघू या आशेने पर्यटक चक्क दोन तास एकाच जागेवर शांत जिप्सी मध्ये बसून राहिले. पर्यटकांना लघूशंका करायला सुद्धा वनरक्षका ने मनाई केली होती. कारण जिप्सीच्या खाली पर्यटक उतरेल कसा वाघोबा अवघ्या २० फुट अंतरावर होता.

जिप्सीचा आवाज आला तर वाघोबा उठायचा अन परत लोटांगन घ्यायचा. दोन तास त्याने पर्यटकांचे मनोरंजन केले. पण पर्यटक सुद्धा त्याची क्रिडा बघण्यासाठी तटस्थ शांत पणे उभे होते. वाघोबाने माकडाची शिकार केली होती. म्हणून तो सुस्त होता.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

- Advertisment -