विश्वशांतीचा मार्ग भारत देश दाखवणार — मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस
रामनवमीला सावनेर येथे विश्वशांतीसाठी विश्वविक्रमी महाआरतीचा वर्ल्ड रेकॉर्ड
हजारो दिव्यांद्वारे महाआरतीची नोंद ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद
सावनेर : “विश्वशांतीसाठी विश्वविक्रमी महाआरती हा विषय अत्यंत हृदयस्पर्शी असून सावनेर-कळमेश्वर क्षेत्रात सावनेरवासियांनी वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. ही संपूर्ण सावनेर-कळमेश्वर क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे. एकीकडे जगात युद्ध सुरू असून भारतात आणि मुख्य म्हणजे सावनेर येथे विश्वशांतीसाठी ही जी प्रार्थना आणि महाआरती केल्या गेली त्याचा सकारात्मक परिणाम नक्कीच दिसून येणार आहे.
मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाच्या आशीर्वादाने जगामध्ये शांती नांदेल आणि जनजीवन सुखमय होईल असा मला विश्वास आहे. आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी अतिशय उत्तम पद्धतीने हा ऐतिहासिक विश्वविक्रम प्रस्थापित केला असून याची नोंद संपूर्ण जगाने घेतली आहे. सावनेर नव्हे, महाराष्ट्र नव्हे, तर संपूर्ण भारताने हा दिव्य सोहळा अनुभवला आहे आणि विश्वस्तरावर भारताची प्रतिमा उंचावली आहे. महाआरतीचा वर्ल्ड रेकॉर्ड करून विश्वशांतीचा संदेश देणारा भारत हा एकमेव देश ठरला आहे.
आमदार डॉ देशमुख यांनी सावनेर-कळमेश्वर क्षेत्रात अनेक विकासाची कामे केली असून 40,000 तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. कोल गॅसिफिकेशन, फर्टीलायझर कॉम्प्लेक्स अशा अनेक मोठ्या प्रकल्पांसाठी त्यांनी माझ्याकडे सतत पाठपुरावा करून ही कामे माझ्याकडून मंजूर करून घेतली आहेत, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सावनेर येथे आयोजित विश्वशांतीसाठी विश्वविक्रमी महाआरती या सोहळ्यात केले. अयोध्या येथील आधीचा विक्रम मोडीत काढत 4911 लोकांनी एकत्रित येऊन सामूहिक महाआरतीचा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
या विश्वविक्रमाबद्दल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सतर्फे प्रमाणपत्र देण्यात आले. विश्वशांतीसाठी विश्वविक्रमी महाआरतीचे आयोजन सावनेर-कळमेश्वर क्षेत्राचे आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी केले होते. रामनवमीच्या पावन पर्वावर, 26 मार्चला सायंकाळी नगर परिषद ग्राउंड, सावनेर येथे ही भव्य दिव्य महाआरती संपन्न झाली. या उपक्रमाची नोंद *गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स (Guinness World Records)* मध्ये घेतल्या गेली आहे.
विश्वशांतीसाठी हजारो दिव्यांद्वारे महाआरतीचा
विश्वविक्रम प्रस्थापित करून विश्वशांतीतून विकासाचा संदेश देण्यात आला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मा. योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 18 ऑक्टोबर 2025 रोजी अयोध्येत हजारो दिव्यांनी आरती करून विश्वविक्रम करण्यात आला होता. सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याच्या दृष्टीने हा विक्रम मोडून सावनेर विधानसभा क्षेत्राची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये व्हावी, यासाठी नागरिकांनी पुढाकार आणि सहकार्य करून सावनेर विधानसभा क्षेत्राने नव्या इतिहासाची नोंद केली आहे.
या ऐतिहासिक क्षणाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, श्री रणजीतबाबू देशमुख, राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल, डॉ आयुश्री देशमुख तसेच अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीत योगी आदित्यनाथ यांचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडल्या गेला. सावनेर येथे बहुसंख्य लोकांनी एकाच वेळी दिव्यांद्वारे महाआरती करून विश्वविक्रम केला.
आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांचे प्रास्ताविक
आज सर्वत्र युद्ध आणि अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळा, रुग्णालयांवरही क्षेपणास्त्रांचे हल्ले होत आहेत. लहान मुले, वृद्ध, महिला, युवक-युवती तसेच पशुपक्षी — प्रत्येक जीव शांतीची अपेक्षा करत आहे. प्रत्येकजण या आक्रोशपूर्ण आणि दुःखद अवस्थेतून बाहेर पडू इच्छितो, आणि संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत आहे शांती प्रस्थापित करण्यासाठी. विश्वशांतीसाठी विश्वविक्रमी महाआरतीचे आयोजन रामनवमीच्या या पावन पर्वावर करण्यात आले आहे. आणि “Most People Performing Diya Rotation Simultaneously” हा विश्वविक्रम आज येथे प्रस्थापित होणार आहे.
आज मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचा जन्मदिन — धर्म, सत्य आणि शांतीचा मार्ग दाखवणारा दिवस मानवाला मानवतेच्या मर्यादेत बांधून ठेवणारा दिवस प्रभू श्रीरामांनी आपल्याला शिकवले. “शक्ती असली तरी संयम राखावा, आणि संघर्ष असला तरी शांतीचा मार्ग निवडावा.”आज हजारो नागरिक एकत्र आले आहेत…आज हजारो दिवे प्रज्वलित झाले आहेत…आणि भारतवासी जगाला शांतीचा संदेश देत आहेत. हा कार्यक्रम केवळ विश्वविक्रम घडवण्यासाठी नाही. हा कार्यक्रम आहे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा हा कार्यक्रम आहे युद्धातून शांतीकडे वाटचाल करण्याचा. अयोध्येत विश्वविक्रम झाला…पण आता भारत देशाने ठरवले आहे.“महाराष्ट्र आणि देशाचे नाव जगात उज्ज्वल करायचेच”
आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत देशाच्या नावावर नवा कीर्तिमान प्रस्थापित करायचा आहे.“एकता आणि शांतीतूनच प्रगती साध्य होते.”आपण सर्वजण जाणता की सावनेरच्या विकासासाठी आपण एकत्र येऊन अनेक कामे केली आहेत. हा विकास केवळ शब्दांत नाही — तो प्रत्यक्ष जमिनीवर दिसत आहे. कारण आपल्या सोबत ठामपणे उभे आहेत. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि चंद्रशेखरजी बावनकुळे
“मुख्यमंत्री आपल्या सोबत — विकास आपल्या हातात!”
त्यांच्या नेतृत्वात साव
नेर नव्या उंचीवर पोहोचेल, याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आज आपण सर्वांनी मिळून “शांतीची ज्योत” प्रज्वलित केली आहे…प्रत्येक हातात एक दीप…प्रत्येक हृदयात एक संकल्प…आपल्याला विश्वशांतीसाठी युद्ध नव्हे, तर बुद्ध हवा आहे.
म्हणूनच तथागत गौतम बुद्ध यांच्या शांती, करुणा आणि प्रेमाच्या संदेशाचा स्वीकार करून, तसेच “वसुधैव कुटुंबकम्” — संपूर्ण विश्व हे एकच कुटुंब आहे,
या संकल्पनेला अंगीकारून, एकता, बंधुता आणि अखंडतेचा संदेश देत आपण विश्वशांतीचा संकल्प करीत आहोत.


