सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

फ्रैंकलिन टेम्पलटन इंडियाचा चेंज द सोच- कन्याकुमारी ते काश्मीर अभियान

फ्रैंकलिन टेम्पलटन इंडियाचा चेंज द सोच- कन्याकुमारी ते काश्मीर अभियान हा राष्ट्रव्यापी उपक्रम म्यूचुअल फंड गुंतवणुकीविषयी जागरूकता पसरवण्यासाठी ऑरेंज सिटी नागपुरात पोहोचला

फ्रैंकलिन टेम्पलटन इंडियाचे अध्यक्ष अविनाश सातवळेकर आर्थिक साक्षरता आणि आर्थिक समावेशनाला चालना देण्यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर अशा 4000+ किमी पेक्षा मोठ्या प्रवासाला निघाले आहेत आणि या प्रवासात वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील लोकांशी ते संवाद साधत आहेत

गुंतवणूकदारांना साक्षर करणारा हा उपक्रम विशेषतः भारतातील महिलांच्या आर्थिक साक्षरतेवर भर देणार आहे, जेणेकरून त्यांची बचतीपासून गुंतवणुकीपर्यंत प्रगती होऊ शकेल

नागपूर : चेंज द सोच कन्याकुमारी ते काश्मीर अभियान हा फ्रैंकलिन टेम्पलटनचा अनोखा, राष्ट्रव्यापी उपक्रम नागपूरमध्ये पोहोचला आहे, ज्याचा उद्देश विशेषतः महिलांमध्ये आर्थिक सक्षमतेचा प्रचार करण्याचा आहे. फ्रैंकलिन टेम्पलटनच्या भारतातील 30 वर्षांच्या वाटचालीचा गौरव करणारा हा 30-दिवसांचा प्रवास कन्याकुमारी या देशाच्या दक्षिण टोकापासून सुरू झाला असून 21 शहरांमधून मार्ग काढत श्रीनगर, जम्मू आणि काश्मीर येथे समाप्त होणार आहे. इंटरॅक्टिव्ह आर्थिक साक्षरता सत्रे, तज्ज्ञांचे विचार आणि समुदायाचा सहभाग या माध्यमातून या मोहिमेचा उद्देश म्यूचुअल फंड गुंतवणुकीशी निगडीत गैरसमज दूर करण्याचा तसेच हजारो भारतीयांना त्यांच्या आर्थिक भविष्याचा ताबा स्वतःच्या हाती घेण्यासाठी आत्मविश्वास देण्याचा आहे.

फ्रैंकलिन टेम्पलटन इंडियाचे अध्यक्ष अविनाश सातवळेकर या मोहिमेचे नेतृत्व करतील आणि देशाच्या प्रवासातून आर्थिक समावेशकतेचा पुरस्कार करतील. ते दर दोन दिवसांनी एका नव्या गावात किंवा शहरात थांबून महिलांच्या विविध गटांसाठी गुंतवणूकदार शिक्षण कार्यशाळांचे आयोजन करतील व त्यांना जीवनातील लक्ष्य साध्य करण्यासाठी बचत, गुंतवणूक आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मितीचे महत्त्व समजावून देतील. या मोहिमेत सहभागी मोठ्या संख्येत सामील होतील.

त्यापैकी बहुतांशी महिला असतील, ज्या शेतकरी (मासेमारी करणाऱ्या समुदायापासून ते विविध पिके घेणाऱ्या समुदायापर्यंत), शैक्षणिक क्षेत्रातील महिला (विद्यार्थी, पालक, शाळा-कॉलेजच्या शिक्षिका), सेल्फ हेल्प ग्रुप (अन्न आणि हँडलूम क्षेत्रातील महिला),

उद्योजिका, खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील कर्मचारी आणि सेना, नौकादळ आणि पोलीस खात्यातील अधिकारी वगैरे असू शकतात.

सदर लॉन्चच्या उपक्रमाविषयी बोलताना फ्रैंकलिन टेम्पलटनचे अध्यक्ष अविनाश सातवळेकर म्हणाले, भारताच्या दीर्घकालीन सामाजिक-आर्थिक विकासासाठी महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणणे अनिवार्य आहे. शहरी केंद्रांनी आर्थिपूर्ण प्रगती केली आहे, पण देशातील लक्षावधी महिला, विशेषतः टियर 2 आणि टियर 3 प्रदेशातील महिला आर्थिक ज्ञान आणि साधने यांच्यापर्यंत पोहोच मिळवण्याच्या बाबतीत वंचित राहिल्या आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून जीवनातील विविध क्षेत्रातील महिलांशी आम्ही संवाद साधू आणि त्यांना बचत, गुंतवणूक करण्यास आणि डिजिटल फायनेंन्सचा अंगीकार करण्यासाठी ज्ञान आणि आत्मविश्वास देऊन सक्षम करू.

ते पुढे म्हणाले, जेव्हा महिला माहितीपूर्ण आर्थिक निर्णय घेतात तेव्हा कुटुंबं लवचिक होतात, समुदायांची भरभराट होते आणि देश सर्वसमावेशक वृद्धीच्या जवळ पोहोचतो. ही दरी भरून काढणे केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसून 2047 पर्यंत विकसित भारत बनण्याच्या देशाच्या ध्येयाच्या आणि अधिक समावेशक व शाश्वत आर्थिक ईकोसिस्टम बनवण्याच्या दिशेत उचललेले हे एक आवश्यक पाऊल आहे.

म्यूचुअल फंड विविध गुंतगवणूक उद्दिष्टे साध्य करण्याच्या सर्वात प्रभावी मार्गापैकी एक आहे, जसे की, दीर्घकालीन संपत्तीचे निर्माण करणे आणि महागाईवर मात करणे. शिवाय, म्यूचुअल फंड गुंतवणूकदारांना आपली गुंतवणूक डायव्हर्सिफाय करण्यास, व्यावसायिक गुंतवणूक कौशल्याचा लाभ घेण्यास, इकॉनॉमीज ऑफ स्केल, लिक्विडिटी, टॅक्स एफिशन्सी आणि कमी तिकीट साइझचा फायदा घेण्यास मदत करतात. फ्रैंकलिन टेम्पलटनने म्यूचुअल फंडांविषयी जागरूकता पसरवण्यासाठी आपला हा आगळावेगळा उपक्रम महाराष्ट्रातील नागपुरात आणला आहे. उद्योग व्यवस्थापनाखालील मालमतेच्या बाबतीत नागपूर देशातील श्रेष्ठ 20 बाजारपेठांपैकी एक आहे.

फ्रैंकलिन टेम्पलटनला महाराष्ट्रात म्यूचुअल फंड्सच्या विकासाची प्रचंड क्षमता दिसली आहे कारण नवीन गुंतवणूकदारांना भारताच्या विकासाच्या कहाणीत सहभागी व्हायचे आहे. ही कंपनी या राज्यात आपले वितरण नेटवर्क विस्तारित करण्याबाबत वचनबद्ध आहे आणि अधिकाधिक गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचण्याचे, त्यांना म्यूचुअल फंड गुंतवणुकीच्या फायद्याविषयी जागरूक करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

सध्या महाराष्ट्रातील म्यूचुअल फंड उद्योगाचे AAUM 3,376,005 लाख कोटी रु. पेक्षा जास्त असून मागील वर्षाच्या तुलेनत त्यात 20% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. ही वाढ मुंबई, पुणे, नागपूर आणि नांदेडसारख्या मोठ्या शहरांमध्ये दिसून येत आहे. ज्यामधून मध्यम ते दीर्घ कालावधीत आशास्पद विकासाचा संकेत मिळतो’. भारतातील म्यूचुअल फंड उद्योगाची व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM) एका दशकात सुमारे सहा पटींपेक्षा जास्त वाढली आहे. ही AUM 31 डिसेंबर 2015 रोजी 12.75 ट्रिल्यन रु होती, जी 31 डिसेंबर 2025 रोजी 80.23 ट्रिल्यन रु. झाली आहे, जी 20% वार्षिक वृद्धी दर दाखवते.

जागतिक गुंतवणुक क्षेत्रात 77 वर्षांच्या अनुभवासह फ्रैंकलिन टेम्पलटनची व्यापक आंतरराष्ट्रीय उपस्थिती आहे आणि उत्पादनांची एक व्यापक श्रेणी त्यांच्याकडे असून त्याच्या व्यवस्थापनासाठी 1600 पेक्षा जास्त गुंतवणूक व्यावसायिकांची एक समर्पित टीम त्यांच्याकडे आहे. 31 डिसेंबर 2025 च्या आकड्‌यांनुसार ही कंपनी जगभरात मिळून 1.68 ट्रिल्यन US डॉलर (अंदाजे 150 लाख कोटी रु.) किंमतीच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करत आहे.

फ्रैंकलिन टेम्पलटनचा भारतात 30 वर्षांचा वारसा आहे आणि भारतात त्यांच्या 37 म्यूचुअल फंड्स योजनांमध्ये मिळून 1.27 लाख कोटी रु. इतकी व्यवस्थापनाखालील सरासरी मालमत्ता आहे. फ्रैंकलिन इंडिया लार्ज कॅप फंड (पूर्वीचा फ्रैंकलिन इंडिया ब्लूचिप फंड), फ्रैंकलिन इंडिया मिड कॅप फंड (पूर्वीचा फ्रैंकलिन इंडिया प्राइमा फंड) आणि फ्रैंकलिन इंडिया फ्लेक्सी कॅप फंड या त्यांच्या तीन मुख्य फंड्सचा 30 पेक्षा जास्त वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे, तर 18 फ्रैंकलिन टेम्पलटन फंड्सना सुरू होऊन 20 पेक्षा जास्त वर्षे झाली आहेत.

- Advertisment -