सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

महाप्रित ने इथिओपियाबरोबर नविनीकरणी ऊर्जा प्रकल्पांमध्ये एकत्रित काम करावे- सामाजिक न्यायमंत्री  धनंजय मुंडे

मुंबई: महाप्रितने‘ इथिओपिया देशाबरोबर नविनीकरणीय ऊर्जा प्रकल्पांमध्ये एकत्रित काम करावेअसे निर्देश सामजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

इथिओपिया देशाच्या जलसिंचन व ऊर्जा विभागाचे राज्यमंत्री व राजदूत अस्फॉ डिन्गामो व त्यांच्या भारतातील समन्वयकासमवेत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे तसेच `महाप्रित`चे अधिकारी यांच्यासोबत मुंबईत संयुक्त बैठक झाली. त्या बैठकीत सामाजिक न्याय मंत्री बोलत होते. या बैठकीला महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळीमहाप्रितचे संचालक (संचलन)  विजयकुमार ना. काळमसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहसचिव  दिनेश डिंगळेमहाप्रितचे कार्यकारी संचालक (प्रशासन)  प्रशांत गेडामकार्यकारी संचालक (पारेषण) रविंद्र चव्हाण,  सतिश चवरे व इतर अधिकारी उपस्थित होते.

 मंत्री मुंडे म्हणालेमहाप्रित करीत असलेल्या प्रकल्पांच्या अनुषंगाने इथिओपिया देशाबरोबर सामंजस्य करार (MOU) करण्याकरिता त्वरित कार्यवाही करावी तसेच  इथिओपिया च्या मंत्रिमहोदयांनी ज्या क्षेत्रामध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाबरोबर प्रकल्प राबविण्याचे प्रस्तावित केले आहे. त्याबाबत महाप्रितने त्वरित बैठका घेऊन पुढील निर्णय घ्यावाअसेही श्री. मुंडे यावेळी म्हणाले.

 इथिओपियाचे राज्यमंत्री  अस्फॉ डिंन्गामो यांनी त्यांच्या देशाची भौगोलिक संरचनापरिस्थितीज्या क्षेत्रात त्यांना एकत्रित काम करण्याचा विचार आहेयाबाबत सविस्तर मुद्दे मांडले. इथिओपियातील पाण्याचा प्रश्न व त्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनाप्रकल्पत्याबाबतची सद्यस्थितीसौरऊर्जा प्रकल्पामध्ये महाप्रितची लागणारी आवश्यकता आणि हे प्रकल्प महाप्रित व  इथिओपिया यांच्या संयुक्त उपक्रमाने राबविण्याचा विचार असल्याचे सांगितले. ज्या – ज्या क्षेत्रामध्ये त्यांना महाराष्ट्र शासनासोबत व महाप्रित कंपनीसोबत एकत्रित काम करावयाचे आहे त्याबाबत इथियोपियाचे राज्यमंत्री अस्फॉ डिंन्गामो यांनी  सविस्तर चर्चा केली. डिन्गामो यांनी कृषीपाणीपुरवठानविनीकरणीय ऊर्जाकृषी फिडरचे सोलरायझेशननवीन तंत्रज्ञानपायाभूत सुविधा व अन्य काही क्षेत्रांबाबत सामंजस्य करार (MOU)  करणार असल्याचे सांगितले. तसेच महाप्रितच्या विविध प्रकल्पांच्या उपयोगितेबाबत समाधान व्यक्त केले. महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक  बिपीन श्रीमाळी यांनी महाप्रित कंपनी व त्यांचे विविध विभाग यामध्ये अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पपर्यावरणसंबंधित प्रकल्पऊर्जा बचत व ऊर्जा संवर्धन प्रकल्पआरएमसी प्लांटकृषी प्रक्रिया मूल्य साखळीपरवडणारी घरेमहामार्ग रस्ते प्रकल्पहायड्रोजन प्रकल्पनवीन आणि उद्योन्मुख ऊर्जा तंत्रज्ञान प्रकल्पसॉफ्टवेअर तंत्रज्ञानसीएसआर प्रकल्प  इत्यादींबाबतची माहिती व सौरऊर्जा प्रकल्प तसेच डाटा सेंटर प्रकल्पाबाबतची कामे सध्या सुरु असून प्रगतिपथावर असल्याची  सविस्तर माहिती दिली. तसेच महाप्रित व इथियोपिया यांच्यासमवेत लवकरच सामंजस्य करार (MOU) करण्याचा मनोदय महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी व्यक्त करून महाप्रितची भूमिका सविस्तरपणे सांगितली. महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी इथियोपियाचे राज्यमंत्री व राजदूत अस्फॉ डिंन्गामो यांनी महाप्रित कार्यालयास भेट दिल्याबाबत आभार मानले.

- Advertisment -