इंदिरा गांधी शासकीय विद्यालय व रुग्णालयामध्ये रुग्णांना तत्पर सेवा द्या
शिवशंभु संघटनेची मागणी
नागपूर: इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात रुग्णांना तत्पर सेवा प्रदान करा, अश्या मागणीचे निवेदन शिवशंभु संघटनेच्या वतीने मेयो रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. लीला अभिचंदानी यांना देण्यात आले. संघटने चे प्रमुख सुरज गोजे यांच्या नेतृत्त्वात हे निवेदन देले. यावेळी चंद्रहास राऊत उपस्थित होते.
अधिष्ठाता डॉ. अभिचंदानी यांच्याशी चर्चा करताना सुरज गोजे यांनी सांगितले. नागपूर हे मेट्रो सिटी म्हणून नावारूपाला आलेले शहर आहे. अशा परिस्थितीत मेयो, मेडिकल, डागा रुग्णालय आरोग्यसेवा देण्यास तत्पर असणे जनतेला अभिप्रेत आहे. असे असताना गरीब रुग्णांना मेयो मधून अनेकदा औषधी मिळत नसल्याने खाजगी औषधालयातून औषध घ्यावी लागते. अनेक वेळा रुग्णांची तपासणी करणारे यंत्र बंद असतात. त्यामुळे रुग्णांना सिटीस्कॅन, सोनोग्राफी बाहेरून करावी लागते. अनेकदा तर रुग्णाला आठ ते दहा दिवसाची प्रतीक्षा करावी लागते. डॉक्टर व पी.जी च्या संख्येत वाढ करावी, असा सल्ला यावेळी सुरज गोजे यांनी अधिष्ठाता यांना दिला. पावसाळ्यामध्ये रोगराई चे प्रमाण वाढत असते. तत्पूर्वी उपाय योजना करण्यात यावी. जे प्रकल्प रुग्णालयाच्या प्रगतीसाठी मागे पडले आहेत. ते प्रकल्प शासनाकडून फंडाची मागणी करून पूर्ण करावे. यावर अधिष्ठाता यांनी सांगितले की येणाऱ्या काळात औषधांचा तुटवडा भासणार नाही. त्या संबंधित बोलणे सुरु आहे. तसेच रुग्णांना काही तक्रार करायची असल्यास तक्रार पेटीची व्यवस्था करण्यात येईल. रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना काही मदत हवी असल्यास पि.आर.ओ नियुक्त करण्यात येईल. त्यासंबंधी फलक सुद्धा लावले जाणार. आपण केलेल्या मागण्यांना लवकरच प्रतिसाद मिळेल अशी ग्वाही यावेळी अधिष्ठाता यांनी दिली.
शिष्टमंडळात डॉ. रवी चव्हाण, डॉ. सावजी, श्याम तेलंग, विलास मामुलकर, अनिल बोरकर, गुलाम रसूल, पोटियावाला, शरद पाठराबे, धीरज काटे, शुभम चातुरकर, उत्तम रंभाड, विवेक खडसे, सागर मौदेकर,हरीश पाठराबे,शरद मौंदेकर,विकी नागोसे, सौरभ हरडे,विनोद रंभाड, राकेश डायरे, अजय खडगी, निर्मला बारापात्रे, कुंती शाहू, लक्ष्मी वर्मा, सरोज वैष्णव, अंजली बाजीराव, सविता बोरकर, अक्षय तलवेकर, स्वप्नील बेलखोडे, राजेश महूर्ले, पियूष धानफोले, रीतिक पवार, अंश ठाकूर आदी उपस्थित होते.