प्रेस क्लब येथे मंगळवारी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन
नागपूर: आंतरराष्ट्रीय योग दिवस मंगळवार २१ जून रोजी संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. नागपुरात हि विविध ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त आरोग्याला लाभदायक अश्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रेस क्लब ऑफ नागपूर, अंकुर सीड्स आणि आर्ट ऑफ लिव्हिंग च्यासंयुक्त विद्यमाने मंगळवार, 21 जून ला नागपूर प्रेस क्लबच्या सभागृहात सकाळी 6:30 वाजता आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विभागीय आयुक्त माधुरी खोडे तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार एस. एन. विनोद उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नागपूर प्रेस क्लब चे अध्यक्ष प्रदिप कुमार मैत्र, सचिव ब्रम्हाशंकर त्रिपाठी व आर्ट ऑफ लिविंगच्या अंजली आर यांनी केली आहे.