अजनी रेल्वे स्टेशन येथे बॉम्ब असल्याची अफवा उडविणारा पोलीसांच्या ताब्यात !
नागपूर: अजनी रेल्वे स्टेशन येथे बॉम्ब असल्याची अफवा उडविणाऱ्या तरुणाला धंतोली पोलीसांनी ताब्यात घेतले. तो दारुड्या असल्याची माहिती आहे. कपिल पुंडलीकराव कोकाटे ३० वर्ष राहणार महाल काशीबाई मंदिर असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. तो ओला गाडीचा चालक आहे. धंतोली पोलीस स्टेशन हद्दितील हि घटना आहे.
प्राप्त माहिती नुसार, सोमवार (२७ जून) रोजी रात्री ८.१० वाजताच्या सुमारास CRO CITY CONTROL नागपुर शहर ला कपिल कोकाटे या तरुणाने अजनी रेल्वे स्टेशन येथे बॉम्ब असल्याची माहिती दिली. तात्काळ CRO CITY CONTROL नागपुर शहर ने या घटने संदर्भात GRP CRO CONTROL ला माहिती दिली. माहिती मिळताच अजनी रेल्वे स्टेशन येथे नागपुर शहर पोलीस व रेल्वे पोलीसांचे बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) पोहचले. संपूर्ण अजनी रेल्वे स्टेशनची बारकाईने तपासणी केली. कुठलीच वस्तु अथवा बॉम्ब परिसरात आढळला नाही.
अजनी रेल्वे स्टेशन येथे बॉम्ब असल्याची माहिती देणाऱ्या कपिल पुंडलीकराव कोकाटे याला धंतोली पोलीसांनी घाट रोड येथे अटक केली. त्याच्या ओला गाडीत पोलीसांना दारुच्या बाटल्या आढळल्याची माहिती आहे. कपिल ने आपल्या ओला गाडी मध्ये नविन सुभेदार, अयोध्यानगर येथून एका डॉक्टरची सवारी घेतली होती. डॉक्टर ने पोलीसांना सांगितले की कपिल हा गाडी चालवित असताना कुणाला तरी शिविगाळी करीत होता. कपिल हा एमएच २४ एयू १२३१ (ओला) गाडीचा ड्रायवर आहे. मालकाला धंतोली पोलीसांनी चौकशी साठी बोलाविले होते. पुढील तपास धंतोली पोलीस करीत आहेत.