दहा वर्षीय मुलाचे अपहरण, केला लैंगिक अत्याचार !
नागपूर: दहा वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकिस आली आहे . एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना आहे. पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे .
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या दाम्पत्याला दहा वर्षीय मुलगा आहे . तो रविवारी दुपारी घराबाहेर खेळत होता. चंदन यादव वय २० याने त्याला जवळ बोलाविले . त्यानंतर त्याने मुलाला जबरदस्तीने त्याच्या घराजवळील झाडाझुडपात नेले व तेथे लैंगिक अत्याचार केला . मुलाने घरी गेल्यावर ही बाब घरच्यांना सांगितली . त्यानंतर त्याच्या वडिलांनी तातडीने एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली . पोलिसांनी गुन्हा नोंदविला व प्रकरणातील गंभीरता लक्षात घेऊन आरोपीला अटक केली . त्याची चौकशी करण्यात येत असून , पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.