मौदा : नागपूर जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या मौदा तालूक्यातील कोटगाव शिवारात आज विज पडून तिन बकऱ्यांचा मृत्यु झाला. तर दोन इसम व एक महिला जखमी झाली. जखमी झालेल्यांची नावे श्रीराम ठवकर, सुरेश तिजारे, सुरेखा तिजारे असे आहेत.
गुरुवार (१४ जुलै) रोजी सकाळ पासून नागपूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. वीजेच्या कडकडाहासह दुपार पासून जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील मौदा तालूका अंतर्गत येणाऱ्या कोटगाव श्रीराम ठवकर यांच्या शेतीच्या शिवारात वीज पडल्याने तिन बकऱ्यांचा जागीच मृत्यु झाला.
तर श्रीराम ठवकर, सुरेश तिजारे व त्यांची पत्नी सुरेखा तिजारे गंभीर जखमी झाले. जखमींव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. घटनेची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी सभापती तापेश्वर वैद्य यांना मिळताच त्यांनी जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. त्यानंतर, तापेश्वर वैद्य यांनी मौदा पोलीस निरीक्षक, तहसीलदार, कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा करुन जखमींना व बकऱ्यांच्या मालकांना तातडीने मदत करण्याची मागणी केली.


