राष्ट्रीय चॅनलचा रिपोर्टर सांगून तरुणीवर केला बलात्कार !
नागपूर- येथील धंतोली पोलीस ठाण्यात दिल्लीतील एका तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे वय २५ वर्षीय असून तो एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीचा रिपोर्टर असल्याचे सांगण्यात येत आहे.
दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित ही नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथील रहिवासी असून, नागपूरच्या आयटी पार्कमधील एका कंपनीत काम करते. क्लबहाऊस चार्ट अॅपच्या माध्यमातून आरोपीने तिची ओळख पटवली.
यावेळी आरोपीने तिची ओळख पत्रकार म्हणून केली. दोघांचे बोलणे सुरूच राहिल्यानंतर २४ जून २०२२ रोजी आरोपी नागपुरात आला. दरम्यान धंतोली परिसरातील एका हॉटेलमध्ये दोघांची भेट झाली. त्यांच्यात संबंध प्रस्तापित झाला. आरोपीने पिडित तरुणीचा अश्लिल व्हिडियो बनविला.
त्यानंतर त्याने पीडितेवर सतत दबाव आणण्यास सुरुवात केली. कंटाळून अखेर पीडित तरुणीने धंतोली पोलीस स्टेशन गाठले. तसेच तरुणीने पोलीसांना आपबिती सांगितली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीसांनी तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास धंतोली पोलीस करीत आहे.