सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

प्रवीण महाजन यांना मानद डॉक्टरेट 

प्रवीण महाजन यांना मानद डॉक्टरेट 
 नागपूर : जल अभ्यास, डॉ. शंकररावजी चव्हाण राज्यस्तरीय जलभूषण पुरस्कारार्थी प्रवीण महाजन यांना सनराईज युनिव्हर्सिटी, अलवर, राजस्थान तर्फे जल क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. 
अलवर येथे आज झालेल्या दिक्षांत  समारंभात सनराईज युनिव्हर्सिटीत चॅन्सलर अॅड. सुभाष यादव, पावरगील्डचे संचालक विनोद कुमार सिंग, भारत सरकारच्या केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचे अध्यक्ष  इंदू शेखर झॉ यांचे उपस्थितीत दिक्षांत समारंभ पार पडला.
डॉ. प्रवीण महाजन यांनी केलेल्या जल क्षेत्रातील ३२ वर्षाच्या कार्याची यासाठी नोंद घेण्यात आली असून महाजन यांनी जलजागृती या विषयावर सातत्याने केलेले जलजागृती कार्य, प्रचार आणि प्रसारासाठी धडपड. लाभधारकांन पर्यन्त पाणी पोहचावे यासाठीचे केलेले अतुलनीय कार्य, शेतकऱ्यांचे पीक पद्धतीत बदला साठी चे प्रयत्न,  ठिंबक सिंचनासाठी प्रयत्न, सोशल मीडियावरील दररोज जलजागृती संदेश, जलसाक्षरता मोहीम,  शालेय विद्यार्थ्यांना जल महत्व कळावे यासाठी चित्रकला स्पर्धा, सूक्ष्म सिंचन पद्धती  अवलंबण्याकरता शासनाकडे केलेला पाठपुरावा, पर्यावरण क्षेत्रातील प्रचार- प्रसार, मार्गदर्शन, प्रदूषण नियंत्रणांसाठीचे कार्य, जलसंपदा काल-आज-उद्या या संदर्भ ग्रंथाची निर्मिती, यात्रेच्या ठिकाणी जलजागृती प्रदर्शनीतून जनतेचे प्रबोधन, पाणी वापर संस्थांचे मेळावे, वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्प मागणी व  केलेले  प्रयत्न,  धरणातील गाळ काढण्याविषयी शासकीय स्तरावर केलेला पाठपुरावा. शासनाच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न. यासोबतच वेळोवेळी जल, पर्यावरण, प्रदूषण यावर लिहिलेले विविध लेख या सर्व गोष्टींचे योगदान पाहता सन राईज युनिव्हर्सिटीने मानद डॉक्टरेट देऊन गौरविले आहे.
प्रवीण महाजन यांच्या नावाची आता जलक्षेत्रात ओळख करून द्यायची गरज उरली नाही. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली या गावाहून आलेल्या महाजनांनी राज्यस्तरावरील जलभूषण पुरस्कार मिळवून विदर्भाचे नाव मोठे केले. आज अनेक संस्था यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करीत असून त्यांच्या कार्याबद्दल जनमानसातही दखल घेण्यात येत आहे. प्रवीण महाजन आता जलक्षेत्रातील डॉक्टर बनले आहेत.
- Advertisment -