सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

उपराजधानीत मुख्याध्यापकाचे अपहरण !

नागपूर : जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीतील एका शाळेच्या मुख्याध्यापकाचे शुक्रवार (२ सप्टेंबर) ला रात्री १०.३० वाजताच्या सुमारास अपहरण झाल्याचे वृत्तसमोर आले आहे. त्यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. प्रदिप मोतीरामानी असे बेपत्ता असलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. ते जरीपटका परिसरात राहतात. महात्मा गांधी प्राथमिक शाळेचे ते मुख्याध्यापक आहेत.

प्राप्त माहितीनुसार, प्रदिप मोतीरामानी हे आपल्या दुचाकी वाहनाने शुक्रवारच्या रात्री खाजगी कामा निमित्त घराबाहेर पडले होते. रात्री उशिरा पर्यंत प्रदिप हे घरी परत आले नसल्याने परिवारांमध्ये चिंत्ता वाढली.

प्रदिपच्या मुलीने वडिलांच्या मोबाइलवर संपर्क साधला असता अपहरणकर्त्यांनी फोन उचलला. आणि अपहरणकर्ते म्हणाले, की तुझ्या वडिलांना जिवंत पाहायचे असेल तर शनिवार दुपार पर्यंत ३० लाख रुपये तयार ठेव, पोलीसांना माहिती दिली तर परिणाम गंभीर होणार अशी धमकी अपहरणकर्त्यांनी प्रदिप मोतीरामानीच्या मुलीला दिली.

मात्र न घाबरता प्रदिपच्या मुलीने घटनेची माहिती, कुटूंबियांना दिली. तसेच, पोलीस स्टेशन जरीपटका ला कळविले. प्रकरण गंभीर असल्याचे बघून ताबडतोब जरीपटका पोलीसांनी घटनेची माहिती वरिष्ठांना दिली. नागपुर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहर पोलीसांना सुचना दिल्या असून प्रदिप यांचा शोध पोलीस घेत आहेत.

विशेष सांगायचे म्हणजे प्रदिप हे एका माजी नगरसेवकाचे मित्र आहेत. प्रदिप यांची दुचाकी पोलीसांना मानकापूर येथील एलिक्सिस इस्पितळा जवळ आढळली. प्रदिप हे एका शाळा संचालकाच्या प्रकरणात साक्षिदार असल्याची माहिती आहे. नागपुर शहर पोलीसांसमोर हे प्रकरण एक चॅलेंजच ठरले आहे.

- Advertisment -