सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

अखिल भारतीय पेपर ट्रेडर्स परिषद 17 सप्टेंबरपासून नागपुरात

अखिल भारतीय पेपर ट्रेडर्स परिषद 17 सप्टेंबरपासून नागपुरात

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करणार उद्घाटन

असीम बोर्डिया एफपीटीएचे नवे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणार

नागपूर : पेपर ट्रेडर्स असोसिएशन , नागपूर तर्फे 17 ते 19 सप्टेंबर या कालावधीत 61 वी ऑल इंडिया पेपर ट्रेडर्स कॉन्फरन्स अर्थात अखिल भारतीय पेपर ट्रेडर्स परिषद , फेडरेशन ऑफ पेपर ट्रेडर्स असोसिएशन आयोजित करण्यात आली आहे . परिषदेचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता हॉटेल रेडिसन ब्लू वर्धा रोड येथे होणार आहे .

सेंच्युरी पल्प आणि पेपरचे सीईओ विजय कौल यांचे बीज भाषण होईल . ए.एस. मेहता , अध्यक्ष आणि संचालक , जे.के. पेपर लिमिटेड आणि वदिराज कुलकर्णी , विभागीय मुख्य कार्यकारी , आयटीसी हे सन्माननीय अतिथी यावेळी उपस्थित असतील तर एफपीटीएचे अध्यक्ष दीपक मित्तल समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील . असीम बोर्डिया हे वर्ष 2022-23 साठीचे एफपीटीएचे नामनिर्देशित अध्यक्ष आहेत . एजीएम आणि कॉन्फरन्स दरम्यान , बोर्डिया यांना एफपीटीएचे नवे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील .

या राष्ट्रीय परिषदेत देशभरातील पेपर उद्योगातील मान्यवर आणि आघाडीचे ब्रँड सहभागी होत आहेत . या तीन दिवसीय कार्यक्रमात व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील 600 हून अधिक प्रतिनिधी सामील होणार आहेत . परिषदेत कागद उद्योगाची सद्यस्थिती , आव्हाने आणि संधी यावर सादरीकरणे होणार असून नजीकच्या भविष्यात या उद्योगात संभाव्य व्याप्तीवर चर्चा करण्यासाठी विविध क्षेत्रांतील प्रतिनिर्धीद्वारे तपशीलवार चर्चा केली जाईल . पेपर ट्रेडर्स असोसिएशन नागपूरने वर्ष 2000 च्या सुरुवातीला नागपुरात राष्ट्रीय परिषद आयोजित केली होती त्यावेळी नागपूरचे महेश खंडेलवाल हे राष्ट्रीय अध्यक्ष होते . दरम्यान , आशिष खंडेलवाल , अध्यक्ष , पीटीए , नागपूर ; हर्षित भन्साळी , सचिव , पीटीए , नागपूर ; स्वागत समितीचे अध्यक्ष विजय खंडेलवाल आणि आयोजन समितीचे अध्यक्ष असीम बोर्डिया , उपाध्यक्ष ललित सूद , कोषाध्यक्ष संदीप अग्रवाल , सह – सचिव किशोर कुशलानी आणि सर्व पीटीए सदस्य हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत .

एफपीटीए बद्दल : एफपीटीए ही ६३ वर्षापासून कार्यरत देशभरातील 35 घटक सदस्य संघटनांची एक संस्था आहे . ही देशातील पेपर ट्रेडर्सची पालक आणि सर्वोच्च संस्था आहे ज्यामध्ये सुमारे 1050 व्यापारी हे थेट सदस्य आहेत . यात देशभरात सुमारे 8000 पेपर व्यापारी आहेत जे एफपीटीएचे सदस्य आहेत . एफपीटीए मोठ्या प्रमाणावर कागदाच्या वापरास प्रोत्साहन देते . कागदाच्या वापरामुळे निसर्गातले हिरवे आच्छादन कमी होते , कागद निसर्गासाठी वाईट आहे , झाडे तोडून कागद तयार केला जातो आणि इतर अनेक गैरसमज दूर करण्यासाठी एफपीटीए प्रयत्नशील आहे .

कागद इतरही स्त्रोतांपासून बनविला जातो जसे की निरुपयोगी पेपरचा पुनर्वापर , शेतीतील कचरा आणि अगदी दगडांपासून सुद्धा पेपर निर्मिती केली जाते . इतर वस्तूंच्या तुलनेत कागद ही दैनंदिन वापरासाठी सर्वात टिकाऊ वस्तू आहे आणि त्याचा पुनर्वापर करता येतो याबबात देखील एफपीटीए जनजागृती करीत आहे .

- Advertisment -