फ्लॅटमध्ये को-पायलटचा मृतदेह सापडला
दिल्ली : सहवैमानिकाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला. पोलिसांना मृतदेहाच्या तोंडावर टेप मिळालेला आहे, तर पाय साखळदंडाने बांधलेले आढळले आहेत. वास्तविक, को-पायलट त्याच्या कुटुंबाचा फोन उचलत नव्हता, त्यानंतर कुटुंबीयांनी घरमालकाला फ्लॅटवर पाठवले. बेशुद्ध को-पायलटला पाहून घरमालकाने पोलिसांना बोलावले.
राजधानी दिल्लीच्या दक्षिण पश्चिम भागात एका खासगी विमान कंपनीत काम करणाऱ्या ३२ वर्षीय को-पायलटचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आत्महत्येचे प्रकरण आहे. पोलिसांना घटनास्थळावरून कोणत्याही प्रकारची गडबड झाल्याचे किंवा पुरावे मिळालेले नाहीत.
खासगी विमान कंपनीत काम करणारा हा सहवैमानिक केरळचा रहिवासी होता. दिल्लीतील पालम येथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये एकटाच राहत होता. रविवारी सकाळी फ्लॅट मालकाने पोलिसांना सांगितले की, तरुण बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडलेला होता आणि फ्लॅटला आतून कुलूप होते. पोलिसांनी दिल्लीच्या अग्निशमन दलाला पाचारण केले, त्यांनी पुढील दरवाजा तोडला. येथून त्याला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी सहवैमानिकाला मृत घोषित केले.
वास्तविक, वैमानिकाचे कुटुंबीय त्याला शनिवारपासून फोन करत होते. त्याने फोन उचलला नाही तेव्हा घरमालकाला फोन केला, घरमालकाने खिडकीतून डोकावले तेव्हा तो जमिनीवर पडला होता.


