डॉ . दंदे फाउंडेशनतर्फे’व्हॉईस आफ लिटील मास्टर्स’गायन स्पर्धा
बुधवार २१ सप्टेंबरपासून संपूर्ण विदर्भात आडिशन्स : सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र व भेटवस्तू
१२ आक्टोबरला नागपुरात अंतिम फेरी , सलील कुलकर्णीची उपस्थिती
नागपूर – पी.जी. दंदे चॅरिटेबल ट्रस्टद्वारा संचालित डॉ . दंदे फाउंडेशनच्या वतीने येत्या बुधवारपासून ( २१ सप्टेंबर ) ‘ व्हॉईस आफ लिटील मास्टर्स ‘ या विदर्भस्तरीय गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . या स्पर्धेच्या आडिशन्स संपूर्ण विदर्भात होणार असून बुधवारी चंद्रपूर येथून सुरुवात होईल . स्पर्धेची अंतिम फेरी १२ आक्टोबरला नागपूर येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात होणार आहे , अशी माहिती डॉ . दंदे फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ . पिनाक दंदे यांनी दिली आहे .
डॉ . दंदै फाउंडेशनच्या वतीने सलग दोन वर्षे आनलाईन गायन स्पर्धा घेण्यात आली . या दोन्ही स्पर्धाना उत्तम प्रतिसाद मिळाला . यंदा ही स्पर्धा विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे . ७ ते १६ वर्षे वयोगटासाठी ही स्पर्धा आहे . २१ सप्टेंबरला चंद्रपूर , २२ सप्टेंबरला वर्धा व अकोला , २३ सप्टेंबरला यवतमाळ व वाशीम , २७ सप्टेंबरला अमरावती तसेच २ ९ व ३० सप्टेंबरला नागपूर येथे या आडिशन्स होणार आहेत . प्रत्येक केंद्रावर विदर्भाच्या विविध भागांमधील प्रथितयश गायक परीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत . आडिशनमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्याना भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात येईल .
१२ आक्टोबरला नागपुरात होणाऱ्या अंतिम फेरीसाठी विदर्भातील सर्वोत्तम गायक निवडण्यात येतील . अंतिम फेरीत २१ हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार , ११ हजार रुपयांचा द्वितीय तर ५ हजार ५०० रुपयांचा तृतिय पुरस्कार दिला जाणार आहे . याशिवाय प्रोत्साहनपर पारितोषिके दिली जातील . या स्पर्धेत ५० हजार रुपयाहून अधिक रोख पुरस्कार दिले जाणार आहेत . विद्यार्थ्यासाठी १०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ८७६७ ९ २ ९ ६०७ , ८३८००१२२३६ किया ७७६७० ९ ०१३३ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
शालेय शिक्षकांसाठीही स्पर्धा याचवेळी विदर्भातील प्रत्येक केंद्रावर शालेय शिक्षकांच्याही आडिशन्स होतील . त्यांचीही अंतिम फेरी १२ आक्टोबरला नागपूरला होईल . यात कुठल्याही विषयाचे शिक्षक सहभागी होऊ शकतात . मात्र त्यांचे प्रवेश शाळांनी निश्चित करायचे आहेत . शिक्षकांसाठी २०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले आहे . सलील कुलकर्णी विशेष आकर्षण १२ आक्टोबरला नागपूर येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्याला सुप्रसिद्ध गायक संगीतकार सलील कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती असेल . पुरस्कार सोहळ्यापूर्वी सलील कुलकर्णी यांचा ‘माझे जगणे होते गाणे’ हा गाणी व गप्पांचा कार्यक्रम होईल . कवीं नितीन भट त्यांच्याशी संवाद साधतील .
आडिशन्सचे वेळापत्र
२१ सप्टेंबर : चंद्रपूर – रोटरी हॉल , रेडक्रॉस भवन २२ सप्टेंबर : वर्धा – स्कूल आफ स्कॉलर्स व शिववैभव सभागृह २२ सप्टेंबर : अकोला आयएमए हॉल , सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनच्या जवळ २३ सप्टेंबर : यवतमाळ – स्कूल आफ स्कॉलर्स , शुभम कॉलनी २३ सप्टेंबर : वाशीम रेखाताई राष्ट्रीय विद्यालय , अकोला नाका रोड २७ सप्टेंबर : अमरावती श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय , शिवाजी नगर २९ सप्टेंबर : नागपूर – स्कूल आफ स्कॉलर्स कब्स , रोटरी गार्डनपुढे , प्रतापनगर