धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यात गडकरींचा’नमस्कार’, फडणवीसांचा’जय भीम’ !
नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी धम्ममंचा वरुन भाषणाचा समारोप’नमस्कार’ने केला. तर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘जय भीम’ने भाषणाचा समारोप केला.
नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमी येथे ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन मंगलमय सोहळ्या निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन मंगल सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पावसामुळे कार्यक्रमाला ७ वाजताच्या सुमारास सुरुवात झाली. सर्वप्रथम दीक्षाभूमी स्मारक समिती पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर, उपस्थित पाहुण्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करुन अभिवादन केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणा अगोदर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धम्ममंचावर भाषण झाले. फडणवीस यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर प्रकाश टाकला. एवढेच नव्हेतर, दीक्षाभूमीच्या विकासासाठी पंधरा दिवसात निधी मंजूर करणार असल्याचे ठाम पणे सांगितले. भाषणाच्या शेवटी मात्र देवेंद्र फडणवीस’जय भीम’ म्हणायला विसरले नाहीत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी धम्ममंचा वरुन भाषणाला सुरुवात केली.
अनुयायी ऐवजी त्यांनी’भाविक’शब्दांचा प्रयोग केला. दीक्षाभूमीच्या प्रलंबित विकास आराखड्या संदर्भात भाष्य करताना गडकरी यांनी दीक्षाभूमी समितीच्या जागेच्या मागणीवर भाष्य करत तत्कालीन दीक्षाभूमी स्मारक समितींच्या पदाधिकाऱ्यांचे उदाहरण देत उपरोक्त मागणी कडे कानाडोळा करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवटी मागणीचा चेंडू राज्य सरकारकडे वळविला.
भाषणाचा शेवट गडकरी यांनी’नमस्कारा’ने केला. पण’जय भीम’करने कदाचित विसरले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी धम्ममंचा वरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चांगलेच कौतूक केले. पण दीक्षाभूमीच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे एकही शब्द त्यांच्या मुखातून निघाले नाहीत. दीक्षाभूमी येथे अनुयायी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतात. मंत्र्यांच्या भाषणाकडे त्यांचे लक्ष नसते. गडकरींनी धम्ममंचा वरुन’जय भीम’का म्हटले नाही, अशी कुजबुज अनुयायांमध्ये सुरु होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण संपताच’जय भीम’म्हटले, पण देशाचे लोकप्रिय नेता नितीन गडकरी यांना कसा’जय भीम’करण्याचा विसर पडला, हा शोधाचा विषय आहे.


